प्रसारमाध्यमं आणि प्रशासनात आरएसएस आपली माणसं घुसवतोय- राहुल गांधी

प्रसारमाध्यमं आणि प्रशासनात आरएसएस आपली माणसं घुसवतोय- राहुल गांधी

प्रसारमाध्यमं आणि प्रशासनात आपली लोकं भरत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसंच मोदी सरकार तरूणांना रोजगार मिळवून देण्यात अयशस्वी ठरल्याचंही गांधीनी म्हटलंय

  • Share this:

नवी दिल्ली, प्रतिनिधी, 17 ऑगस्ट : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भाजप आणि संघावर पुन्हा जोरदार टीका केली आहे. प्रसारमाध्यमं आणि प्रशासनात आपली लोकं भरत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच मोदी सरकार तरूणांना रोजगार मिळवून देण्यात अयशस्वी ठरल्याचंही गांधीनी म्हटलंय. सरकारच्या मेक इन इंडिया धोरणावर आणि गो संरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारावरही राहुल गांधीनी यावेळी तोंडसुख घेतलं.

निवडणूका कशा जिंकायच्या हे संघाकडून शिकावं असंही राहुल गांधी यावेली म्हणाले. तसंच सत्तेत येण्याआधी कधीही संघाने तिरंग्याला वंदन न केल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय. देशाला स्वच्छ भारत नव्हे तर सच भारताची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.

शरद यादव यांनी आयोजीत केलेल्या विरासत बचावो संमेलनात राहुल गांधी बोलत होते. या सभेत काँग्रेस, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्सचे नेतेही उपस्थित होते. नवी दिल्लीत हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 03:30 PM IST

ताज्या बातम्या