Home /News /news /

'राहुल गांधी अध्यक्ष बनणार की नाही?', पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचा सोनिया गांधी यांना पुन्हा सवाल

'राहुल गांधी अध्यक्ष बनणार की नाही?', पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचा सोनिया गांधी यांना पुन्हा सवाल

CWC च्या बैठकीनंतर पक्षात वाद सुरू झाले होते. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. अशा वेळी आता कॉंग्रेसचे सर्व नेते आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ असणार आहे.

    नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या नेतृत्वाबाबतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. खरंतर, 14 सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (monsoon session) सुरू होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सर्व नेते पुन्हा एकदा वर्चुअल मार्गाने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. CWC च्या बैठकीनंतर पक्षात वाद सुरू झाले होते. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. अशा वेळी आता कॉंग्रेसचे सर्व नेते आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ असणार आहे. इतकंच नाही तर पक्षातील महत्त्वाच्या बदल्यांविषयी आणि अध्यक्षपदाबाबत परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी काँग्रेस नेते सोनीया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी बोलणार आहेत. यामध्ये बैठकीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी संरक्षणमंत्री एके एंटनी सहभागी होणार आहेत. 19 वर्षीय कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार, नंतर नेलं कोविड सेंटरला दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीच्या (CWC)अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादावादीबद्दल अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी मी दुखावले असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मी दुखावले गेले आहे, असं सांगत त्यांनी हे सगळेच आपले कार्यकर्ते असल्याचं सांगितलं होतं. Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष असणार आहेत. तर . पुढच्या 6 महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळवण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असं काँग्रेस नेते आणि कार्यकारिणीचे सदस्य के. एच. मुनियप्पा यांनी सांगितलं होतं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Coronavirus, Sonia gandhi

    पुढील बातम्या