राहुल गांधी काँग्रेसचे बिनविरोध अध्यक्ष होणार, फक्त घोषणेची औपचारिकता बाकी

राहुल गांधी काँग्रेसचे बिनविरोध अध्यक्ष होणार, फक्त घोषणेची औपचारिकता बाकी

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती, पण राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झालाय.

  • Share this:

4 डिसेंबर, नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती, पण राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. किंबहुना आता फक्त राहुल गांधी अध्यक्ष होण्याच्या घोषणेची औपचारिकताच बाकी आहे.

राहुल गांधी यांनी आज सकाळी काँग्रेस मुख्यालयात येऊन अध्यक्षपदासाठी रितसर अर्ज भरला. राहुल गांधी यांच्या अर्जावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. याशिवाय राहुल यांच्या उमेदवारीला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वीच पाठिंबा दिलाय.

याशिवाय काँग्रेस कार्याकारिणीतील बहुतांश सदस्य राहुल गांधींनी अर्ज भरला त्यावेळी उपस्थित होते. तसंच राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातून तब्बल 900 लहानमोठे काँग्रेस नेते दिल्लीत आले होते. तब्बल १९ वर्षानंतर काँग्रेसला राहुल गांधींच्या रुपात नवा अध्यक्ष मिळणार आहे.

११ डिसेंबरला राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा होईल, तसंच २८ डिसेंबर म्हणजेच काँग्रेसच्या स्थापना दिनाला राहुल गांधी सोनिया गांधींकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारतील.

 

First published: December 4, 2017, 6:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading