राहुल गांधींनी गुजरातमध्ये दिली आतापर्यंत 12 मंदिरांना भेट

राहुल गांधींनी गुजरातमध्ये दिली आतापर्यंत  12 मंदिरांना भेट

2014 साली अल्पसंख्याकांना झुकतं माप दिलं होतं. तेव्हा काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आता धर्मनिरपेक्षतेवरून लोकांचा विश्वास उठून गेला आहे असं ए.के अॅन्टनींचं म्हणणं काँग्रेसला पटू लागल्याची चिन्हं दिसत आहेत

  • Share this:

29 नोव्हेंबर: काँग्रेसचे उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी गुजरातच्या रणधुमाळी आतापर्यंत तब्बल 12 मंदिरांना भेट दिली आहे. तर गेल्या एका महिन्यात तब्बल 19 मंदिरांना भेट दिली  आहे.

2014 साली अल्पसंख्याकांना झुकतं माप दिलं होतं. तेव्हा काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता.  त्यामुळे आता धर्मनिरपेक्षतेवरून लोकांचा विश्वास उठून गेला आहे असं ए.के अॅन्टनींचं म्हणणं काँग्रेसला पटू लागल्याची चिन्हं दिसत आहेत.

गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानली जाते. त्यामुळे आता मृदु हिंदुत्वाचा प्रयोग काँग्रेस करत असल्याची चिन्हं दिसत आहेत. याच उदाहरण म्हणजे सध्या राहुल गांधींची वाढती मंदिर वारी. हिंदुंची मतं मिळवण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष आता मंदिरांना भेट देत आहेत. मंदिरांना भेट देत जरी असले तरी आज  सोमनाथ मंदिरात त्यांची बिगर हिंदू अशी नोंद झाल्यामुळे नवाच वाद उपस्थित झाला आहे. त्यानंतर राहुल गांधी जानवी हिंदू असल्याची माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

या सगळ्यामध्ये नेहरू-गांधींचा वारसा सांगणारी काँग्रेस आपला धर्मनिरपेक्षतेचा विचार विसरत चालली आहे की काय ही शंका आल्याशिवाय राहत नाही.

राहुल गांधींनी भेट दिलेली मंदिरं

वैद्यनाथ मंदिर, थारा

खोदिया माताजी, वरणा

द्वारकाधीश, द्वारका

चामुंडा माता, चोटिला

खोडलधाम, राजकोट

सोमनाथ, प्रभास पतन

भाटीजी महाराज मंदिर, फागवेल

उनई माता, सिंध

अक्षरधाम मंदिर, गांधी नगर

वीर मेघमाया, पतन

अंबाजी, बनांसकांठा

बहुचारजी, मेहसाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 11:28 PM IST

ताज्या बातम्या