ममता बॅनर्जींच्या धरणे आंदोलनाला राहुल गांधी ते शरद पवारांपर्यंत दिग्गजांनी दिला पाठिंबा

ममता बॅनर्जींच्या धरणे आंदोलनाला राहुल गांधी ते शरद पवारांपर्यंत दिग्गजांनी दिला पाठिंबा

मी ममता बॅनर्जींशी चर्चा केली आहे, या प्रकरणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत

  • Share this:

कोलकता 04 फेब्रुवारी : केंद्र सरकार अधिकाराचा गैरवापर करत आहे असा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी  काल रात्रीपासून आंदोलन पुकारलं आहे.  शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्ं होतं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी ममता बॅनर्जींशी चर्चा केली आहे, या प्रकरणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत असं राहुल गांधींनी ट्विट करून स्पष्ट केलं.

तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो, असं पत्र राज ठाकरेंनी लिहलं.

पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचा दुरूपयोग केला गेला असल्याची टीका शरद पवार यांनी ट्विटवरून केली आहे. विरोधकांवर सूड उगवण्यासाठी कारवाई केली जात असून हा लोकशाहीवर हल्ला असल्याचीही टीका पवार यांनी केली आहे.

तर दुसरीकडे सीबीआयनं त्यांचं काम करायचं की नाही असा थेट सवाल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे. जेव्हा सीबीआय काम करतं तेव्हा ते राजकीय नाट्य असतं, जेव्हा नाही करत तेव्हा पिंजऱ्यातला पोपट असतं. अशा शब्दांत सीतारामण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसंच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांनीदेखील राज्यात सीबीआयला प्रवेश बंदी केली आहे. याआधी अखिलेश यादव यांनीदेखील सीबीआयवर सडकून टीका केली होती. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर हा वाद आणखी तीव्र होणार हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नाही.

तर ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगालमध्ये तृणमुलकार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पश्चिम मदिनापूरमध्ये  तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केला. हुगळीमध्ये तृणमूलच्या कार्यरकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. राज्यभरात पश्चिम बंगालचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले.

आंदोलनाला बसलेल्या ममता बॅनर्जी आज त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहणार आहेत. मी जिथं धरणं आंदोलन करतीये त्याच ठिकाणाहून विधानसभेच्या कामकाजात सहभागी होईन असं ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये  सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं  निर्माण झालेल्या वादाप्रकरणी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज सकाळी साडे दहा वाजता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

तर दुसरीकडे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली. परिणामी त्यांना जाहीर सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आता ममता सरकारचे मोजकेच दिवस राहिलेत अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

VIDEO: ...जेव्हा मोदींच्याच स्टाईलमध्ये बोलत राहुल गांधी म्हणतात, 'चौकीदार चोर है'

First published: February 4, 2019, 7:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading