भाजप देशात आग लावतोय ; काँग्रेसची धुरा स्वीकारताना राहुल गांधींचा घणाघात

भाजप देशात आग लावतोय ; काँग्रेसची धुरा स्वीकारताना राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा स्वीकारणार आहेत. सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाची सारी धुरा आता राहुल गांधींवर आली आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत.

  • Share this:

16 डिसेंबर, नवी दिल्ली : भाजप देशात आग लावतोय तर काँग्रेस तीच आग विझवतोय. अशा शब्दात राहुल गांधी आज काँग्रेसची धुरा सांभाळताना भाजपवर घणाघाती हल्ला केला. तर मोदींच्या कठोर टीकेमुळेच माझा मुलगा राहुल आता कणखर बनलाय. काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याबद्दल आई म्हणून मी त्याचं अभिनंदन करते, अशा शब्दात सोनिया गांधींनी राहुल गांधींना सुभेच्छा दिल्या. आज दुपारी 12वाजता नवी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात राहुल गांधीच्या पदभार अघिग्रहनाचा सोहळा रंगला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व दिग्गज नेते  या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

 

Loading...

 

राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सोनिया गांधी यांनी तब्बल 19 वर्षे काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं आहे.

देशभरात काँग्रेसच्या कार्यालयातही राहुल गांधी अध्यक्ष झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. राहुल गांधी आज सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र स्वीकारतील. सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी पक्षाला नव्या रुपात पुढे नेण्यासाठी रुपरेषा मांडतील.

काँग्रेस पक्ष सध्या आपल्या वाईट काळातून जात आहे. सध्या फक्त सहा राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. पुढील वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामध्ये पक्षाला विजय मिळवण्यांचं मोठं आव्हान राहुल गांधींसमोर आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलही काँग्रेसच्या विरोधात गेलेत त्यामुळे तिथं काँग्रेस हरली तर त्याचं खापरही पुन्हा राहुल गांधी यांच्यावरच फुटणार आहे. तरीही राहुल गांधींना 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच कामाला लागावं लागणार आहे.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी

1) आचार्य कृपलानी 1947

2) पट्टाभी सितारामय्या 1948-49

3) पुरुषोत्तमदास टंडन 1950

4) जवाहरलाल नेहरु 1951-54

5) यू. एन. धेबर 1955-59

6) इंदिरा गांधी 1959

7) नीलम संजीव रेड्डी 196063

8) के. कामराज 196467

9) निजलिंगअप्पा 1968

10) जगजीवनराम 197071

11) शंकर दयाळ शर्मा 197274

12) देवकांत बरुआ 1975-77

13) इंदिरा गांधी 197884

14) राजीव गांधी 198591

15) पी. व्ही नरसिंहराव 199296

16) सिताराम केसरी 199698

17) सोनिया गांधी 1998 ते 2017

18) राहुल गांधी - 2017 पासून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2017 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...