पीएनबी घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदीची पंतप्रधानांशी जवळीक होती ! - राहुल गांधी

पीएनबी घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदीची पंतप्रधानांशी जवळीक होती ! - राहुल गांधी

हायमंड किंग नीरव मोदी हा पंतप्रधानांसोबत डावोसच्या परदेश दौऱ्यात सामील होता. त्यामुळे मोदी सरकारनेच या बँक घोटाळ्यात नीरव मोदीला पाठिशी घातल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय.

  • Share this:

15 फेब्रुवारी, नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि डायमंड किंग नीरव मोदी याच्या विरोधात सीबीआयने लूक ऑऊट नोटीस जारी केलीय, तसंच आज सकाळीच ईडीने नीरव मोदीच्या मुंबईतील घर आणि ऑफिसेस अशा एकून 12 ठिकाणी छापे टाकले असून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आलीय. पण नेटवर्क 18च्या सूत्रांच्या माहितीनुसार नीरव मोदी हा गेल्या 1 जानेवारीपासूनच फरार असून तो यापूर्वीच देशाबाहेर पळाल्याची माहिती मिळतेय, सूत्रांच्या माहितीनुसार नीरव मोदी हा स्विझरलँडला पळून गेल्याची माहिती मिळतेय. त्याच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरवापर करून तब्बल 11,500 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेचेही काही उच्च पदस्थ अधिकारी सामील असल्याचा आरोप होतोय. दरम्यान, या पीएनबी बँक घोटाळ्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पुन्हा टार्गेट केलंय. हायमंड किंग नीरव मोदी हा पंतप्रधानांसोबत डावोसच्या परदेश दौऱ्यात सामील होता. त्यामुळे मोदी सरकारनेच या बँक घोटाळ्यात नीरव मोदीला पाठिशी घातल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. या मुद्यावरून राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारला काही सडेतोड प्रश्नही उपस्थित केलेत.

PNB बॅंक घोटाळा प्रकरणी काँग्रेसनं उपस्थित केलेले प्रश्न :-

1) नीरव मोदींची पंतप्रधान मोदींशी जवळीक !

2) नीरव मोदी पंतप्रधानांसोबत दावोसला कसे ?

3) 12 हजार कोटींचा घोटाळा, सरकार काय करत होतं ?

4) मल्यासारखाच नीरवही पळाला, तरी सरकार मात्र झोपलेलं !

rg

First published: February 15, 2018, 4:51 PM IST

ताज्या बातम्या