राहुल गांधींचा 'खत्तम, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया'चा Video होतोय तुफान Viral

राहुल गांधींचा 'खत्तम, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया'चा Video होतोय तुफान Viral

राहुल गांधी यांनी सभेत बोललेल्या वाक्यावरून नेटिझन्सनी मीम्स तयार केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक सभाग आणि रॅली सुरु आहेत. या सभांसाठी राज्यातील नेत्यांसोबत राष्ट्रीय स्तरावरील नेते देखील येत आहेत. काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मैदानात उतरवले आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लातूर येथे सभा घेतली. राहुल गांधी यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी सरकारच्या मेक इन इंडियावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्या या भाषणाचा व्हीडिओ काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता नेटिझन्सनी याच व्हिडिओतील काही भाग कट करून त्यावर मीम्स तयार केले आहेत.

लातूरमधील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, इस्त्रोची निर्मिती काँग्रेसने केली. आता त्याचा फायदा मोदी घेत आहेत. अवकाशात रॉकेट सोडल्यामुळे देशातील युवकांच्या पोटात जेवण जाणार नाही. यावेळी चीनच्या अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीवरून देखी त्यांनी मोदींना सवाल केला. मोदींनी सुरु केलीले मेक इन इंडिया योजना अयशस्वी ठरल्याचे सांगताना राहुल गांधी म्हणाले, 'मेक इन इंडिया खत्तम, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया.'

राहुल गांधी यांच्या नेमक्या या वाक्यावरून नेटिझन्सनी मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

SPECIAL REPORT : पुण्यात 'नो वॉटर व्हाय व्होट', उमेदवाराच्या तोंडच 'पाणी' पळालं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या