सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांची पत्रकार परिषद ही गंभीर बाब - राहुल गांधी

सुप्रीम कोर्टाच्या 4 मुख्य न्यायाधीशांना सरन्यायाधीश यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यावी, लागणं, ही अतिशय गंभीर बाब असून, लोकशाहीसाठीही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलीय.

Chandrakant Funde | Updated On: Jan 12, 2018 10:04 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांची पत्रकार परिषद ही गंभीर बाब - राहुल गांधी

12 जानेवारी, नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या 4 मुख्य न्यायाधीशांना सरन्यायाधीश यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यावी, लागणं, ही अतिशय गंभीर बाब असून, लोकशाहीसाठीही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलीय. या न्यायाधिशांनी मांडलेल्या प्रश्नांकडे केंद्राने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, तसंच जस्टिस लोया यांच्या मृत्यूचीही ज्येष्ठ न्यायाधिशांमार्फतच चौकशी व्हावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्याच न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या न्यायाधीशांनी समोर येऊन व्यथा सांगावी हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. असे घडणे हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

दरम्यान, याच मुद्यावर पुढे नेमकी काय भूमिका घ्यायची यासंदर्भात काँग्रेसची राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठकही झालीय. तर दुसरीकडे डी. राजा यांनीही सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती चेमलेश्वर यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे विरोधकांकडून या मुद्याचं राजकीय भांडवल केलं जाणार यात शंका नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close