राहुल गांधींना आपल्या आईकडून खूप काही शिकावं लागेल – दिग्विजय सिंह

राहुल गांधींना आपल्या आईकडून खूप काही शिकावं लागेल – दिग्विजय सिंह

राहुल गांधीं समोर मोठं राजकीय आव्हान असून त्यांना सोनिया गांधींकडून खूप काही शिकावं लागेल असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेत दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांना दिलाय. राहुल यांच्यांमध्ये काम करण्याची अफाट ऊर्जा आहे असंही ते म्हणाले.

  • Share this:

भोपाळ,ता.12 एप्रिल : राहुल गांधीं समोर मोठं राजकीय आव्हान असून त्यांना सोनिया गांधींकडून खूप काही शिकावं लागेल असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेत दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांना दिलाय. राहुल यांच्यांमध्ये काम करण्याची अफाट ऊर्जा आहे. त्यांचं राजकारण हे मुल्य आणि सिद्धांतांवर आधारीत असल्याचं त्यांनी न्यूज 18 हिंदींशी बोलताना सांगितलं.

दिग्विजय सिंह सध्या नर्मदा परिक्रमेवर असून त्यांची ही परिक्रिमा सध्या अंतिम टप्प्यात आहे. 192 दिवसांची ही यात्रा असून तीन हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी चालत केलाय. या परिक्रमेसाठी त्यांनी गुजरात निवडणूकीच्या आधी राहुल गांधींकडून खास रजा मागून घेतली होती. दररोज तीस, पस्तिस किलोमीटर चालल्याने दिग्विजय सिंह यांच्या पायांना फोडं आले असून त्यांचं वजन घटलं आहे. आपली ही अध्यात्मिक यात्रा असून राजकारणाशी त्याचा संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींनी सर्वात आधी आपली टीम तयार करून कामाला सुरवात केली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत काम करताना टीमचा मोठा वाटा असतो असंही ते म्हणाले. या टीममध्ये आपल्याला घेतलं किंवा घेतलं नाही तरी काही फरक पडणार नाही. ते जे काम देतील ते काम करणार असल्याचंही ते म्हणाले. मध्यप्रदेशच्या आगामी निवडणूकीत आपण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

First published: April 12, 2018, 3:57 PM IST

ताज्या बातम्या