मध्य प्रदेश, 11 मे : मध्य प्रदेशच्या देवासचे काँग्रेस उमेदवार प्रल्हाद टिपनिया यांचा एक व्हिडिओ खुद्द राहुल गांधींनी बनवला. टिपनिया हे स्वतः लोकसंगीतील ज्येष्ठ गायक आहेत. सहाब बंदगी असं त्यांना मानानं म्हटलं जातं. त्यांच्या प्रचारासाठी राहुल जेव्हा देवासला गेले होते, तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.