राफेलप्रकरणी थेट सौदा करत होते नरेंद्र मोदी - राहुल गांधी

राफेलप्रकरणी थेट सौदा करत होते नरेंद्र मोदी - राहुल गांधी

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन याही संसदेत खोटं बोलल्या असं म्हणत काँग्रेस अध्यक्षांनी पुन्हा एकदा जेपीसी चौकशीची मागणी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राफेल डीलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राचा उल्लेख करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल सौद्यात थेट फ्रांसशी संबंध असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले की, 'पंतप्रधानांनी देशाच्या वायुसेनाच्या हितसंबंधांशी तडजोड केली. तथापि, राफेल करारानुसार, रक्षा सचिव जे. मोहन कुमार यांनी स्पष्ट केलं की, पीएमओला लिहिलेल्या पत्रांत राफेलच्या किंमतींचा उल्लेख नव्हता, त्यांनी इतर हमी आणि नियम आणि अटींना सहमती दिली नव्हती.'

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन याही संसदेत खोटं बोलल्या असं म्हणत काँग्रेस अध्यक्षांनी पुन्हा एकदा जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. राहुल म्हणाले की, "रॉबर्ट वाड्रा, चिदंबरम यांची तपासणी करावी. आपण सगळ्यांना कायद्याने न्याय मिळवून देता तर मग राफेलचीही तपासणी करावी. राफेलमध्येही बोला. '

ते पुढे म्हणाले की, 'पंतप्रधानांनी स्वत: एअर फोर्सचे 30 हजार कोटी रुपये लुटले आणि एका खाजगी कंपनीला दिले. आम्ही एका वर्षापासून हा मुद्दा उचलून धरला आहे. आता यात आणखी एक अहवाल समोर आला. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी फ्रेंच सरकारशी यावर वारंवार चर्चा करत असतात.'

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी झालेली भेट ही फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका असंही राहुल गांधी म्हणाले. राफेलवरून त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही असा मुद्दाही राहुल यांनी अधोरेखित केला.

तर ही पत्रकार परिषदे घेण्याआधीच राहुल गांधी यांनी ट्वीटदेखील केलं होतं. 'आपल्या देशाचे वीर सैनिक, तुम्ही आमचे रक्षक आहात. तुम्ही देशासाठी तुमचे प्राणही पणाला लावण्यासाठी तयार असता. आम्हाला तुमचा गर्व आहे.'

VIDEO : अशोक चव्हाण म्हणतात... 'भाजपचं आतून कीर्तन वरून तमाशा'

First published: February 8, 2019, 12:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading