S M L

राहुल गांधींना जायचं 'कैलास मानस सरोवर'यात्रे ला!

Ajay Kautikwar | Updated On: Apr 29, 2018 03:42 PM IST

राहुल गांधींना जायचं 'कैलास मानस सरोवर'यात्रे ला!

नवी दिल्ली,29 एप्रिल : राजधानी झालेल्या जन आक्रोश सभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. भाषण संपल्यावर राहुल गांधी आपल्या जागेवर जावून बसले आणि आभार प्रदर्शन सुरू असताना पुन्हा त्यांनी माईकच्या ताबा घेतला. मला कार्यकर्त्यांना काही सांगायचं आहे असं म्हणत त्यांनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली.

राहुल गांधी कार्यकर्त्यांना म्हणाले, मी काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी माझा नेते तुम्ही आहात कर्नाटकात असताना माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हेलिकॉप्टर 8 हजार फुट खाली आलं. मला क्षणभर वाटलं सगळं संपला आता. नंतर मी विचार केला मला मानस सरोवरला जायचं आहे.

कर्नाटकातल्या विधानसभा निवडणूका झाल्या की मी कैलास मानससरोवरला जाणार आहे. त्यासाठी मला 15 दिवसांची रजा पाहिजे आहे. असं राहुल गांधींनी विचारताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांनी परवानगी दिली. या आधीही राहुल गांधींनी मी शिवभक्त असल्याचं सांगितलं होतं. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 03:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close