'विजय मल्ल्याच्या विधानाची नरेंद्र मोदींनी करावी चौकशी, अरुण जेटलींनी द्यावा राजीनामा'

'विजय मल्ल्याच्या विधानाची नरेंद्र मोदींनी करावी चौकशी, अरुण जेटलींनी द्यावा राजीनामा'

मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो

  • Share this:

नवी दिल्ली, १३ सप्टेंबर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी भेट घेतली होती, असे मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. विजय मल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.

विजय मल्ल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी भेट घेतली होती, असे मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हटले होते. मल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींना लक्ष्य केले. तसेच विजय मल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजेरी लावली होती. मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयात हा खटला सुरू आहे.

'मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला,' असे मल्ल्याने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यानंतर, देशभरात खळबळ उडाली. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्र जारी करुन मल्ल्याचा दावा खोडून काढला आहे. तसेच '२०१४ पासून आजपर्यंत मी मल्ल्याला भेटीसाठी कधीही वेळ दिली नसल्याचे जेटलींनी म्हटले आहे.'

VIDEO - गणेशोत्सव विशेष : गणपतीच्या डोक्यावर चंद्र कसा आला?

First published: September 13, 2018, 9:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading