S M L

केंद्रातलं मोदी सरकार आरएसएसच चालवतोय- राहुल गांधी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि संघ परिवारावर पुन्हा हल्लाबोल केलाय. केंद्रातलं मोदी सरकार हे आरएसएसच चालवत असून केंद्रातल्या प्रत्येक मंत्रालयात संघाने त्यांचे लोक बसवलेत एवढंच नाहीतर केंद्रातल्या सचिवांच्या नियुक्त्या सुद्धा संघाच्या इशाऱ्यावरूनच होताहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 13, 2018 09:47 PM IST

केंद्रातलं मोदी सरकार आरएसएसच चालवतोय- राहुल गांधी

13 फेब्रुवारी, बंगळुरू : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि संघ परिवारावर पुन्हा हल्लाबोल केलाय. केंद्रातलं मोदी सरकार हे आरएसएसच चालवत असून केंद्रातल्या प्रत्येक मंत्रालयात संघाने त्यांचे लोक बसवलेत एवढंच नाहीतर केंद्रातल्या सचिवांच्या नियुक्त्या सुद्धा संघाच्या इशाऱ्यावरूनच होताहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. ते सध्या कर्नाटकच्या प्रचार दौऱ्यावर आहेत.

केंद्रातल्या मोदी सरकारने नोटबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी करून देशाचं वाटोळं केल्याने सामान्य लोक भाजपवर प्रचंड नाराज आहेत, 2019मध्ये केंद्रात पुन्हा काँग्रेसची सत्तावापसी झाली तर आम्ही जीएसटीच्या अंमलबजावणीत आमुलाग्र बदल करू, असं आश्वासनही राहुल गांधींनी व्यापाऱ्यांना दिलं. आज त्यांनी बंगळुरूमधील व्यापारी महासंघाची बैठक घेतली. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, मोहन भागवत यांनी लष्कराच्या युद्धासाठीच्या तयारीसंदर्भात केलेल्या विधानावरही राहुल गांधींनी यापूर्वीच तीव्र आक्षेप घेतलाय. मोहन भागवत यांचं हे विधान म्हणजे भारतीय लष्कराचा अपमान असून या विधानाबद्दल त्यांनी भारतीय लष्कराची जाहीर माफी मागावी, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close