गांधी, नेहरू, आंबेडकर हे अनिवासी भारतीय !-राहुल गांधी

गांधी, नेहरू, आंबेडकर हे अनिवासी भारतीय !-राहुल गांधी

काँग्रेसची चळवळ ही 'एनआरआय' अर्थात अनिवासी भारतीयांनी उभी केली. महात्मा गांधी हे अनिवासी भारतीय होते, पंडित जवाहरलाल नेहरू हेही इंग्लंडहून परतले होते, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देखील अनिवासी भारतीयच होते. या सर्वांचं काँग्रेस चळवळीत मोठं योगदान होतं.

  • Share this:

न्यूयॉर्क, 22 सप्टेंबर : काँग्रेसची चळवळ ही 'एनआरआय' अर्थात अनिवासी भारतीयांनी उभी केली. महात्मा गांधी हे अनिवासी भारतीय होते, पंडित जवाहरलाल नेहरू हेही इंग्लंडहून परतले होते, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देखील अनिवासी भारतीयच होते. या सर्वांचं काँग्रेस चळवळीत मोठं योगदान होतं. त्यामुळे भारताच्या उभारणीत अनिवासी भारतीयांचं मोठं योगदान आहे, असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी अनिवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी ही भूमिका मांडली.

गांधी, नेहरू आणि इतर सगळ्यांकडे भारताबाहेरच्या जगाचा अनुभव होता. भारतात परतल्यावर या सगळ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग देश उभारणीसाठी केला असेही त्यांनी म्हटले. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील सुमारे २००० कॉग्रेस समर्थक अनिवासी भारतीयांना राहुल गांधींनी संबोधित केलं. राहुल गांधी दोन आठवड्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

नवभारताची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांबाबत आपले विचार मांडताना राहुल गांधी पुढे म्हणाले, की राष्ट्र निर्मात्या नेत्यांपैकी प्रत्येकजण भारताबाहेर गेला, बाहेरचे जग पाहिले, पुन्हा मायदेशात परतला आणि आपल्योसोबत आणलेल्या कल्पनांचा वापर करत त्याने देशाला बदलण्याचे काम केले, असे हजारो आहेत, ज्यांच्या योगदानाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही याकडेही राहुल गांधी यांनी अनिवासी भारतीयांचे लक्ष वेधले. भारतीय धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचीही आठवण राहुल गांधींनी यावेळी काढली. कुरियन देखील अनिवासी भारतीय असल्याचे ते म्हणाले.

अनिवासी भारतीयांना भारताच्या विकासातील महत्वाचे घटक असल्याचे म्हणताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. भारतातील केंद्र सरकार हे लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करत असून भारतात जातीय हिंसाचार आणि असहिष्णूतेत सतत वाढ होत असल्याची चिंता राहुल गांधींनी व्यक्त केलीय.

First published: September 22, 2017, 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading