S M L

जेव्हा राहुल गांधी लग्नाच्या प्रश्नावर, बॉक्सर विजेंद्र सिंगकडून 'नॉक आऊट' होतात !

ख्यातनाम बॉस्किंगपटू विजेंद्र सिंग यांनी राहुल गांधींना ''तुम्ही नेमकं कधी लग्न करणार ?'' असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी हा जुनाच प्रश्न असल्याचं सांगत थेटपणे उत्तर देणं टाळलं पण तरीही विजेंद्र सिंग यांनी आपला चिवटपणा लावून धरत राहुल गांधींना उत्तर द्यायला अखेर भाग पाडलंच. ''माझा नशिबावर विश्वास आहे, त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा होईल'' असं त्रोटक उत्तर देत राहुल गांधींनी अधिकचं बोलणं टाळलं

Chandrakant Funde | Updated On: Oct 26, 2017 09:33 PM IST

जेव्हा राहुल गांधी लग्नाच्या प्रश्नावर, बॉक्सर विजेंद्र सिंगकडून 'नॉक आऊट' होतात !

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारतीय राजकारणात राहुल गांधींच्या विरोधकांकडून त्यांच्या लग्नाचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. पण आजवर राहुल गांधी त्यावर कधीच बोलले नव्हते. पण नवी दिल्लीच्या एका स्पोर्ट अवॉर्ड कार्यक्रमात बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी नेमका हाच 'मिलेनिअर क्वेशन' विचारून राहुल गांधींना नॉकआऊट केल्याचं बघायला मिळालं.

त्याचं झालं असं की, नवी दिल्लीत पीएचडी वार्षिक स्पोर्ट अवॉर्डसचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला राहुल गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांच्या प्रश्नांना अगदी मोकळेपणाने उत्तरं देत होते. नेमकं त्याचवेळी ख्यातनाम बॉस्किंगपटू विजेंद्र सिंग यांनी राहुल गांधींना ''तुम्ही नेमकं कधी लग्न करणार ?'' असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी हा जुनाच प्रश्न असल्याचं सांगत थेटपणे उत्तर देणं टाळलं पण तरीही विजेंद्र सिंग यांनी आपला चिवटपणा लावून धरत राहुल गांधींना उत्तर द्यायला अखेर भाग पाडलंच. ''माझा नशिबावर विश्वास आहे, त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा होईल'' असं त्रोटक उत्तर देत राहुल गांधींनी अधिकचं बोलणं टाळलं पण या प्रश्नाने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

विजेंदर सिंग याने खेळाबाबत विचारलेल्या प्रश्नावरही राहुल गांधींनी मनमोकळं उत्तरं दिलं ''मी व्यायाम, रनिंग, स्विमिंग करतो तसंच आयकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. मी खेळतो पण लोकांसमोर या गोष्टीबद्दल बोलत नाही ''माझ्या आयुष्यात खेळाचं महत्त्व होतं आणि राहणार आहे. दिवसातला एक तास मी खेळतो पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला खेळायला वेळ मिळाला नसल्याचंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 09:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close