गुजरातच्या निकालांमुळे मोदींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या बाबतीत विश्वासार्हता ही एक मोठी समस्या आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. गुजरात निकालांवर राहुल गांधींनी आज प्रथमच मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया दिली.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 05:24 PM IST

गुजरातच्या निकालांमुळे मोदींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

19 डिसेंबर, नवी दिल्ली : गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मोदींच्या बाबतीत विश्वासार्हता ही एक मोठी समस्या आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. गुजरातचा निकाल हा काँग्रेससाठी आमच्या प्रयत्नांच्या तुलनेच निश्चितच समाधानकारक आहे तर भाजपसाठी मोठा झटका असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. गुजरात निकालांवर राहुल गांधींनी आज प्रथमच मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधी म्हणाले, ''आमच्यासाठी हा खूप चांगला निकाल आहे. ठीक आहे पराभव झाला, जिंकू शकत होतो. पण तिथे थोडी कमतरता राहिली, 'तीन चार महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलो तेव्हा काँग्रेस भाजपासोबत लढू शकत नाही, असं म्हटलं जायचं, पण आम्ही मेहनत घेतली त्याचाच निकाल तुमच्या समोर आहे. भाजपाला या निकालांमुळे जबरदस्त फटका बसला आहे''

राहुल गांधी यांनी यावेळी नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवरही टीका केली. ''गुजरात मॉडेलवर जनतेचा विश्वास नाही. मार्केटिंग आणि प्रचार चांगला आहे, मात्र आतमधून हे गुजरातचं मॉडेल पूर्णपणे पोकळ आहे. त्यामुळेच मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मोदी देऊ शकले नाहीत''

'गुजरातच्या निकालाने भाजपा आणि मोदींना धडा शिकवला आहे. तुमच्यात जो क्रोध आहे तो तुमच्या कामी येणार नाही, आमचं प्रेमच तुमचा पराभव करेल, असं उत्तर गुजराती जनतेने दिलं आहे', असा टोला राहुल गांधींनी लगावला. 'नरेंद्र मोदी सतत भ्रष्टाचारावर बोलत होते, पण नरेंद्र मोदींच्या निवडणुकीच्या भाषणात कुठेच विकास, नोटाबंदीचा उल्लेख नव्हता. राफेल आणि जय शाह प्रकरणावर मोदींच्या तोंडातून शब्द निघत नाही', अशी टीका राहुल गांधीनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...