मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राहुल गांधींच्या रोड शोमध्ये गोंधळ, बॅरिकेड तुटल्यामुळे पत्रकार जखमी

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये गोंधळ, बॅरिकेड तुटल्यामुळे पत्रकार जखमी

राहुल गांधी आज अर्ज भरताना रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॅरिकेड तुटल्याने गोंधळ झाला आणि त्यात काही पत्रकार जखमी असल्याचंही सांगण्यात येत आहे.

    वायनाड, 04 एप्रिल : राहूल गांधींच्या रोड शो दरम्यान कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये गदारोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. रोड शोवेळी बॅरिकेड तुटल्यानं अनेक पत्रकार जखमी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे.

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात वायनाड मदरारसंघात निवडणूक होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राहुल गांधी आज अर्ज भरताना रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

    यावेळी बॅरिकेड तुटल्याने गोंधळ झाला आणि त्यात काही पत्रकार जखमी असल्याचंही सांगण्यात येत आहे. प्रियांका गांधींदेखील वायनाडच्या या रॅलीमध्ये उपस्थित होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे मुस्लिम लीगनं देखील राहुल गांधी यांना पाठिंबा दिला असून प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे.

    शिवाय, राहुल गांधी  वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह पाहायाला मिळत आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून निकाल 23 मे रोजी लागणार आहे. दरम्यान, आता वायनाडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    First published:

    Tags: Lok sabha election 2019, Priyanka gandhi, Rahul gandhi, Wayanad S11p04