S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

भाजपमध्ये लालकृष्ण अडवानींचा अपमान होतो, त्याचं मला दु:ख - राहुल गांधी

भाजपमध्ये ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे गुरू लालकृष्ण अडवानींचा मान ठेवत नाही असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मंगळवारी मुंबईत केला. भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्यावर टीका केलीय.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 12, 2018 08:44 PM IST

भाजपमध्ये लालकृष्ण अडवानींचा अपमान होतो, त्याचं मला दु:ख - राहुल गांधी

मुंबई,ता.12 जून: भाजपमध्ये ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे गुरू लालकृष्ण अडवानींचा मान ठेवत नाही असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मंगळवारी मुंबईत केला. मला अडवानींच्या सध्याच्या अवस्थेबद्दल दु:ख वाटतं असंही ते म्हणाले.

भिवंडीत कोर्टात राहण्यासाठी राहुल गांधी मुंबईत आले होते. दुपारी त्यांनी मुंबई बुथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं. काँग्रेसच्या काळात माध्यमांना भिती नव्हती, आत मात्र माध्यमं मोकळेपणानं बोलत नाहीत.

अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे माजी पंतप्रधान आहेत, त्यांच्या विरूद्ध काँग्रेसनं निवडणूक लढवली मात्र त्यांच्याप्रती काँग्रेसला आपार आदर आहे.आणि त्यामुळेच वाजपेयी आजारी असताना सर्वात आधी त्यांना भेटायला मी गेलो होते अशी माहितीही त्यांनी दिली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपनं टीका केलीय. काँग्रेसला ज्येष्ठांवर बोलण्याचा अधिकार नाही, काँग्रेसमध्ये सिताराम केसरी, अर्जुन सिंग, प्रणव मुखर्जी यांना काय वागणूक मिळाली  हे त्यांनी तपासून बघावं अशी टीका भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 08:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close