नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान देत असतानाच काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्यांने त्यांना घरचा आहेर दिलाय. राहुल गांधी हे नेते नाहीत, ते अजुनही शिकत आहेत असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदमंत्री हंसराज भारव्दाज यांनी व्यक्त केलंय. राहुल यांना अजुनही पद मिळालेलं नाही त्यामुळं त्यांचं नेतृत्व सिद्ध व्हायचं आहे असंही ते म्हणाले.
हंसराज भारव्दाज हे गांधी घराण्याचे विश्वासू समजले जातात. इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी ते एक होते. केंद्रात अनेक वर्ष त्यांनी मंत्रिपदही सांभाळलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं काँग्रेसमधले जुने लोक राहुल यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याचं स्पष्ट होत असल्याचं बोललं जातंय.
भाजपला आव्हान देत काँग्रेसही धर्माचं राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. धर्माचा आधार घेत असं राजकारण करणं योग्य नाही असंही ते म्हणाले. भारव्दाज यांच्या या वक्तव्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या वाढत असल्याचं म्हटलं जातं.
काँग्रेस आणि राहुल गांधी हे आक्रमकपणे भाजपला अंगवार घेत आहेत. आपली प्रतिमा बदलून राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. असं असताना पक्षातल्याचं एका ज्येष्ठ नेत्यानं राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं भाजपच्या हातात आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे.
#WATCH: Former Union Law Minister Hansraj Bhardwaj says, "I don't consider Rahul Gandhi a leader yet. He'll understand when he gets a post. Congress fails because it indulges in politics of religion. Rahul Gandhi is learning. He will become a leader when public accepts him" pic.twitter.com/efiXSV6Eov
— ANI (@ANI) November 15, 2018