गुजरात विधानसभा प्रचाराचं राहुल गांधींनी रणशिंग फुकलं !

गुजरात विधानसभा प्रचाराचं राहुल गांधींनी रणशिंग फुकलं !

डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानवसभा निवडणुकीच्या प्रचाराला राहुल गांधींनी आजपासून सुरुवात केली. जामनगर जिल्ह्यातल्या भटिया नावाच्या गावात ते आधी गेले होते, तिथून ते द्वारकामधल्या हांजदा खाडी गावात गेले. तिथे त्यांनी चक्क बैलगाडी चालवली.

  • Share this:

जामनगर, 25 सप्टेंबर : डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानवसभा निवडणुकीच्या प्रचाराला राहुल गांधींनी आजपासून सुरुवात केली. जामनगर जिल्ह्यातल्या भटिया नावाच्या गावात ते आधी गेले होते, तिथून ते द्वारकामधल्या हांजदा खाडी गावात गेले. तिथे त्यांनी चक्क बैलगाडी चालवली. बैलगाडीत उभारूनच त्यांनी सत्कार स्वीकारला. त्यानंतर ते जामनगरला गेले तिथे त्यांनी बसमधूनच भाषण केलं.. नोटबंदी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. कुणालाही न विचारता नोटबंदी केली, आणि डिजिटल इंडियाचा नारा द्यायला लागले. पण शेतकरी किंवा कामगाराला पैसे मिळतात ते कार्डनं मिळतात का, शेतकरी बियाणं क्रिडिट कार्डनं करतात का, अशा शब्दात राहुल मोदींवर बरसले.

पंधरा दिवसांच्या परदेश दौऱ्यावरून येताच राहुल गांधींनी गुजरात विधानसभा प्रचाराचं रणशिंग फुकलंय. परदेशी विद्यापीठातली त्यांची भाषणही चांगलीच गाजली. विशेषतः बर्कले विद्यापीठातल्या राहुल गांधींच्या भाषणाची चांगलीच चर्चाही झाली. त्यामुळे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी आत्तापासूनच लक्ष घातलं तर काँग्रेसला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो कारण सध्या गुजरातमध्ये पटेल आरक्षण आंदोलक समर्थकांनी 'विकास वेडा झाला' या नावाने पंतप्रधान मोदी आणि तिथल्या भाजप सरकारविरोधात सोशल मीडियातून जोरदार रान पेटवलंय. अमित शहांनीही या ट्रोल कॅम्पेनची चांगलीच धास्ती घेतलीय. कदाचित त्यामुळेच राहुल गांधींनी परदेश दौऱ्यावरून येताच गुजरात निवडणुकीत लक्ष घातल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading