काँग्रेसच्या इफ्तारला प्रणव मुखर्जींची हजेरी

काँग्रेसच्या इफ्तारला प्रणव मुखर्जींची हजेरी

काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत आज प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले. प्रणव मुखर्जी हे संघाच्या व्यासपठावर गेल्यानं काँग्रेस त्यांच्यावर नाराज होतं. मात्र मुखर्जी आल्यानं काँग्रेसने हा वाद टाळल्याचं बोललं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.13 जून : काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत आज प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले. या इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जीना निमंत्रण नाही असं सुरवातील वृत्त होतं मात्र नंतर खुद्द राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जींना निमंत्रण दिलं आणि ते या इफ्तारला उपस्थितही राहिले.

प्रणव मुखर्जी हे संघाच्या व्यासपठावर गेल्यानं काँग्रेस त्यांच्यावर नाराज होतं. मात्र मुखर्जी आल्यानं काँग्रेसने हा वाद टाळल्याचं बोललं जातं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलही या इफ्तारला उपस्थित होत्या. नवी दिल्लीच्या ताज पॅलेस या हॉटेलमध्ये काँग्रेसनं इफ्तार पार्टी दिली.

काँग्रेसनं या इफ्तारपार्टीसाठी 18 पक्षांना निमंत्रण दिलं होतं. मात्र अनेक पक्षांचे नेते या पार्टीला उपस्थित राहिले नाही. सिताराम येचुरी, शरद यादव, दिनेश त्रिवेदी आणि डीएमकेच्या कनिमोळी या इफ्तारला उपस्थित होत्या.

काँग्रेसची ही इफ्तार पार्टी म्हणजे राजकीय पार्टी असल्याची टीका भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 10:27 PM IST

ताज्या बातम्या