महात्मा गांधींनी जोडण्याचं तर पंतप्रधान मोदींनी तोडण्याचं काम केलं - राहुल गांधी

महात्मा गांधींनी जोडण्याचं तर पंतप्रधान मोदींनी तोडण्याचं काम केलं - राहुल गांधी

'महात्मा गांधी यांनी जोडण्याचं काम केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तोडण्याचं काम करत आहेत. जाती धर्मात भांडणं लावणं आणि राजकारण करणं हे  नरेंद्र मोदींच काम आहे.'

  • Share this:

वर्धा,ता.2 ऑक्टोबर :   काही उद्योगपती देश लुटण्याचं काम करताहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात भागीदार आहेत. चौकीदार म्हणून आलेले नरेंद्र मोदी  यांनी चौकीदारी केली नाही तर पैसे लुटायला परवानगी दिली. राफेल प्रकरणात देशाचा विश्वासघात केला असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.  काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. विद्वेषाचं राजकारण करून देश तोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मोदींचं काम तोडण्याचं

महात्मा गांधी यांनी जोडण्याचं काम केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तोडण्याचं काम करत आहेत. जाती धर्मात भांडणं लावणं आणि राजकारण करणं हे  नरेंद्र मोदींच काम आहे. मोदी हे गांधींच्या प्रतिमेसमोर जावून नमस्कार करतात, गांधीजी हे सत्य आहिंसा आणि शांततेचे पुजारी होते मात्र मोदी हे दररोज या तत्वांविरूद्ध काम करतात.  जाती धर्माच्या नावावर लोकांना भडकावून सत्ता मिळवणं हेच त्याचं काम आहे.

टार्गेट मोदी

राहुल गांधी यांच्या भाषणाचा पूर्ण रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच होता. देशात नोटबंदी करण्यात आल्यानंतर विजय मल्ल्या आणि  नीरव मोदींसारखे उद्योगपती हे पंतप्रधानांच्या मदतीने आपला काळा पैसा पांढरा करत होते.  मोदींनी सामान्य लोकांना रांगेत उभं केलं आणि द्योगपतींनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप त्यांनी केला.

रोजगार कुठे आहे?

सभेला आलेल्या युवकांना उद्देशून ते म्हणाले, मोदींनी सत्तेवर येताना 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन पाळलं नाही. सगळ्याच गोष्टी चीनवरून आयात होतात. भारतात तयार होणाऱ्या वस्तुंवरही मेड इन चायना असं लिहिलं जातं.  कुठे गेले रोजगार असा सवालही त्यांनी केला. लोकांची फसवणूक झाली आहे असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही कर्ज माफ करू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या उद्योगपतींच तीन लाख कोटींपेक्षा जास्तीचं कर्ज माफ केलं. मात्र शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली नाही. काँग्रेसला संधी मिळाली तर लगेच आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. सरकारला ता पाच वर्ष होत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत असंही ते म्हणाले.

आता आम्हाला संधी द्या!

लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवून त्यांना सत्ता दिली, मात्र त्या विश्वासाला ते पात्र ठरू शकले नाही. प्रत्येक गोष्टीत ते अपयशी ठरले. आता पुन्हा काँग्रेसला संधी द्या असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2018 05:02 PM IST

ताज्या बातम्या