2जी घोटाळा निकालामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड- राहुल गांधी

2जी घोटाळा निकालामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड- राहुल गांधी

मोदींच्या नेतृत्वातलं भाजपचं सरकारच मुळात खोटारडेपणाच्या पायावर उभा असल्याचा घणाघात राहुल गांधी केलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली.

  • Share this:

22 डिसेंबर, नवी दिल्ली : मोदींच्या नेतृत्वातलं भाजपचं सरकारच मुळात खोटारडेपणाच्या पायावर उभा असल्याचा घणाघात राहुल गांधी केलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

2 जी spectrum कथित घोटाळ्याचं सत्य न्यायालयाच्या निर्णयामुळे जनतेसमोर आलेलं आहेच. पण मोदी त्यांच्या कार्यकाळातील भष्ट्राचारावर 'ब्र' शब्दही का काढत नाहीत. असा खडा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय. 2जी पासून राफेल विमान खरेदीपर्यंत भाजपने खोटारडेपणा केल्याचं राहुल गांधी म्हणाले. अमित शहांच्या मुलाच्या घोटाळ्यावर मोदी अजूनही गप्प का आहेत, असा खडा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय.

गुजरात निवडणुकीदरम्यान, काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नांवर मोदी अजूनही गप्प आहेत यावरूनच भाजपचा खोटारडेपणा भारतीयांसमोर आल्याचं स्पष्ट होतंय. सर्वच क्षेत्रातला भाजपचा हा खोटारडेपणा आम्ही जनतेच्या दरबारात मांडू, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलंय. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राहुल गांधींनी घेतलेली ही पहिलीच कार्यकारिणी होती. या बैठकीनंतरची त्यांची देहबोलीही बऱ्यापैकी आक्रमक होती. गुजरातमध्ये वाढलेल्या जागा, 2जी घोटाळ्याचा निकाल आणि इकडे महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळल्याने काँग्रेसची प्रतिमा पुन्हा उजाळताना दिसतेय. म्हणूनच राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का हेच पाहायचं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 07:32 PM IST

ताज्या बातम्या