पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची क्रूर थट्टा - राहुल गांधी

पेट्रोल-डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट ही जनतेची क्रूर थट्टा - राहुल गांधी

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.30 मे: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. ट्विटवरून राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरलं.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं सर्व नागरिक त्रस्त आहेत.

महागाई आकाशाला भिडली आहे. असं असताना दर कमी करण्याची ही तुमची पद्धत आहे का? असं असेल तर ते अतिशय बालिशपणाचं आणि जनतेची क्रूर थट्ट आहे.

मागच्या आढवड्यात मी तुम्हाला तेलाचे दर कमी करण्याचं चॅलेंज दिलं होतं. 1 पैशांनी दर कमी करून तुम्ही ते आव्हान अजुन स्वीकारलेलं नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

First published: May 30, 2018, 2:38 PM IST

ताज्या बातम्या