'आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी नजरेला नजर भिडवत नाहीत'

'आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी नजरेला नजर भिडवत नाहीत'

'नरेंद्र मोदींनी रोजगार देण्याच्या गोष्टी केल्या होत्या पण अचानक रात्री 8 वाजता नोटबंदी केली. जीएसटीच्या नावाखाली पंतप्रधानांनी सगळं उध्वस्त केलं' असंही राहुल गांधी म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : सोमवारी काँग्रेसच्या बूथ कार्यक्रमामध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला आहे. 'आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी नजरेला नजर मिळवत नाहीत' असं राहुल गांधी म्हणाले आहे.

'नरेंद्र मोदींनी रोजगार देण्याच्या गोष्टी केल्या होत्या पण अचानक रात्री 8 वाजता नोटबंदी केली. जीएसटीच्या नावाखाली पंतप्रधानांनी सगळं उध्वस्त केलं' असंही राहुल गांधी म्हणाले.पुलावामा हल्ल्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर बाण सोडला आहे. ते म्हणाले की, 'भाजप सरकारने मसूद अजहरला तुरुंगातून सोडवलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवलच मसूदला कंधारमध्ये सोडण्यासाठी गेले होते' असा आरोप राहुल गांधी यांनी लगावला आहे.ते पुढे म्हणाले की, 'मेक इन इंडियाच्या बाता करणारे पंतप्रधान स्वत:च मेड इन चायनाचे कपडे, चपला वापरतात.' असाही आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष रिंगणात कंबर कसून उतरले आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षातून विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या फैरी सुरू आहे.

राहुल गांधींकडून मसूद अजहरचा आदरार्थी उल्लेख, भाजपने शेअर केला हा व्हिडिओ

राहुल गांधी यांच्या एका विधानावरुन भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा आदरार्थी उल्लेख केला. राहुल गांधी यांच्या या विधानाचे व्हिडिओ भाजपने twitter शेअर केला असून तो व्हायरल होत आहे.

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याने घेतली होती. याच मसूद अजहरला भाजपने मुक्त केल्याचा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहेत. मात्र आज बोलताना त्यांनी अजहरचा उल्लेख करताना मसूद अजहरजी असा केला. भाजपने राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर करताना #RahulLovesTerrorists हा हॅशटॅग वापरला आहे.

VIDEO :'शरद सोनवणे हे पक्षातले नाॅन परफाॅर्मिंग अॅसेट होते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2019 08:05 PM IST

ताज्या बातम्या