पंतप्रधानांना 'नीच' म्हणून हिनवणाऱ्या मनीशंकर अय्यरांनी तात्काळ माफी मागावी-राहुल गांधी

2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना 'चहावाला' म्हणून हिनवणाऱ्या मनीशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ''नीच माणूस, गंदी नाली किडा,'' अशी खालच्या पातळीवरचे शब्दप्रयोग करून गुजरातची निवडणूक भाजपसाठी आणखी सोपी करून दिलीय. राहुल गांधीनी वेळीच सावध होत तात्काळ मनीशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांची जाहीर माफी मागण्याचे आदेश दिलेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2017 08:55 PM IST

पंतप्रधानांना 'नीच' म्हणून हिनवणाऱ्या मनीशंकर अय्यरांनी तात्काळ माफी मागावी-राहुल गांधी

07 डिसेंबर, नवी दिल्ली : 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना 'चहावाला' म्हणून हिनवणाऱ्या मनीशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ''नीच माणूस, गंदी नाली का किडा,'' अशी खालच्या पातळीवरचे शब्दप्रयोग करून गुजरातची निवडणूक भाजपसाठी आणखी सोपी करून दिलीय. अर्थात मोदींनी काँग्रेसचे वाचाळवीर अलगद जाळ्यात अडकताच आपली भाषा जानिवपूर्वक मवाळ करत, गुजराती जनताच मनीशंकर अय्यरांना मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देईल, असं भावनात्मक आणि डिप्लोमॅटिक प्रत्युतर दिलंय. दरम्यान, कपिल सिब्बलांच्या चुकीने तोंड पोळलेल्या राहुल गांधीनी वेळीच सावध होत तात्काळ मनीशंकर अय्यर यांना पंतप्रधानांची जाहीर माफी मागण्याचे आदेश दिलेत. भाजपचे नेते कितीही खालच्या पातळीवरची भाषा वापरत असले तरीही काँग्रेस नेत्यांनी आपला सुसंस्कृतपणा सोडू नये, असा सज्जड दमच राहुल गांधींनी आपल्या वाचाळवीर नेत्यांना दिलाय.

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांच्या या एका वक्तव्यामुळे पक्षाची गुजरात निवडणुकीत चांगलीच कोंडी झालीय. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'नीच आदमी' असं म्हटल्याचं कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांना फटकारलंय. अय्यर यांनी मोदींची माफी मागावी, अशी काँग्रेस आणि आपली इच्छा असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. ऐन गुजरात निवडणुकीत अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याचा नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. अय्यर यांचं वक्तव्य हा गुजरातचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. अखेर या प्रकरणावर अय्यर यांनी सारवासारव केली. आपल्या शब्दाचा गैरअर्थ काढला गेल्याचा दावा त्यांनी केला.

खरंतर राहुल गांधींनी, गुजरात निवडणुकीत भाजपच्या 22 वर्षांच्या राजवटीत विकास कुठे झाला ? हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा उपस्थित करून मोदी-शहा जोडगोळीला चांगलं कोंडीत पकडलं होतं. विकासाच्या मुद्यावर बॅकफूटवर गेलेली नरेंद्र मोदी ही निवडणूक 'गुजराती अस्मिता' आणि राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर जिंकू पाहताहेत. अशातच कपिल सिब्बल, मनीशंकर अय्यर यांच्यासारखे काँग्रेसचे वाचाळवीर नेते दररोज एक नवनवीन वादग्रस्त विधान करून मोदींना ही निवडणूक आणखी सोपी करून देताना दिसताहेत. म्हणूनच राहुल गांधींन कपिल सिब्बल यांनी गुजरात निवडणुकीपासून दूर राहण्याचे आदेश दिलेत. पण मनीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींना 'नीच माणूस' असं हिनवून आपल्याच पक्षाला अडचणीत आणलंय, तर कपिल सिब्बल यांनी राम मंदिर खटल्याची सुनावणी 2019 च्या निवडणुकीनंतर करावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाने केलीय. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा गुजरातच्या निवडणुकीत मोठा करणं भाजपला आणखी सोपं गेलंय. या दोन्ही चुकांमुळे हाता तोंडाशी आलेली निवडणूक काँग्रेस आपल्याच वाचाळवीरांमुळे गमावणार तर नाहीना, अशी भीती सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...