'राफेल'वर राहुल गांधींनी मागितली सरकारकडे या 10 प्रश्नांची उत्तरं!

नवी दिल्ली - राफेल खरेदीतल्या भ्रष्टाचार प्रकरणावर लोकसभेत बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी केला आणि जेपीसी चौकशीची मागणी केली.

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतरच लढाऊ विमानांच्या किंमती का वाढल्या? या किंती वाढविण्यास कोण जबाबदार आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतरच लढाऊ विमानांच्या किंमती का वाढल्या? या किंती वाढविण्यास कोण जबाबदार आहे? (फोटो सौजन्य - पीटीआय)

राफेलच्या किंमतीत बदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण विभागानं जे आक्षेप घेतले त्याकडे का दुर्लक्ष केलं?

सुरूवातीला 100 पेक्षा जास्त विमानं खरेदी करायची होती. नंतर विमानांची संख्या कमी का करण्यात आली?

विमानांची जर तात्काळ आवश्यकता होती तर विमानं अजून ही भारतात का आली नाहीत?

राफेल करार करताना फक्त काही ठराविक कंपन्यांचीच का निवड करण्यात आली?

HAL या सरकारी मालकीच्या कंपनीकडे लढाऊ विमानं बनविण्याची क्षमता असताना त्यांना ही विमानं बनविण्याचं कंत्राट का देण्यात आलं नाही?

ज्या कंपनीला संरक्षण उत्पादन तयार करण्याचा कुठलाही अनुभव नाही अशा कंपनीची निवड का करण्यात आली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फ्रान्स दौऱ्यात ज्या उद्योगपतींना सोबत नेलं होतं त्यांची माहिती देशाला दिली गेली पाहिजे?

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणात जे वक्तव्य दिलं त्याची चौकशी सरकारने करावी? या प्रकरणातल्या फाईल्स माझ्याकडे आहेत असं पर्रिकर म्हणाल्याची गोव्याच्या एका मंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याची सत्यता सरकारने तपासली पाहिजे.

या प्रकरणात जर सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत तर सरकार चौकशीला का घाबरतं आहे. राफेलची संयुक्त संसदीय समितीमार्फेत चौकशी झाली पाहिजे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 05:17 PM IST

ताज्या बातम्या