Home /News /news /

मोदी सरकारचं योग्य दिशेने पहिलं पाऊल, राहुल गांधींकडून मोदींचं कौतुक

मोदी सरकारचं योग्य दिशेने पहिलं पाऊल, राहुल गांधींकडून मोदींचं कौतुक

राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे

    नवी दिल्ली, 26 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यादरम्यान गरीबांच्या मदतीसाठी अर्थमंत्र्यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्याचे देशातील अनेक नेत्यांकडून कौतुक केले जात आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी गरीब आणि गरजूंसाठी मदत पॅकेज जाहीर केले. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, मोदी (Narendra Modi) सरकारने योग्य दिशेने पहिलं पाऊल उचललं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोरोना विषाणूच्या साथीवर आणि त्याच्या आर्थिक परिणामापासून गरीब जनतेचा बचाव करण्यासाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्कम गरजूंना मदत म्हणून दिली जाणार आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'आज सरकारने आर्थिक मदत पॅकेजची घोषणा करणे ही योग्य दिशेने उचलेलेल पहिले पाऊल आहे. भारतातील शेतकरी, रोजंदारी कामगार, महिला आणि वृद्ध लॉकडाऊनचा सामना करीत आहेत. मदत पॅकेजेसमध्ये सर्व वर्गातील लोकांचा विचार करुन अर्थमंत्र्यांनी हे पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे. अर्थमंत्री म्हणाले की रेशन दुकानातून 80 दशलक्ष कुटुंबांना तीन महिन्यासाठी 5 किलो गहू किंवा एक किलो डाळ-तांदळासह मोफत देण्यात येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Congress, Corona virus in india, नरेंद्र मोदी, भाजप, राहुल गांधी

    पुढील बातम्या