S M L

आक्रमक राहुल आणि सोनियांच्या चेहेऱ्यावरचे बदलणारे भाव !

राहुल भाषणाला उभे राहिल्यानंतर घोषणा आणि टाळ्यांनी स्टेडियम दणाणून गेलं. सुरवातीपासूनच राहुल गांधी आक्रमक होते. त्याच्या भाषणात जोर होता, जरब होती आणि उत्स्फुर्तपणाही होता.

Ajay Kautikwar | Updated On: Mar 18, 2018 07:36 PM IST

आक्रमक राहुल आणि सोनियांच्या चेहेऱ्यावरचे बदलणारे भाव !

नवी दिल्ली,18 मार्च : सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश बदल रहा है असा नारा दिला होता. या नाऱ्यावर विरोधक तुटून पडले. देश बदलला की नाही हे माहित नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मात्र वेगानं बदल असल्याचं काँग्रेस महाअधिवेशात दिसून आलं. राहुल गांधींनी अध्यक्षपद स्विकारल्यानंतरचं पक्षाचं हे पहिलंच महाअधिवेश. त्यामुळं ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं होतं. मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या भाषणाने ते जान आणतील का असा प्रश्न विचारला जात होता या सगळ्यांना राहुल यांनी निराश केलं नाही.

या भाषणाची उत्तम तयारी त्यांनी केल्याचं सुरवातीपासूनच जाणवत होतं. राहुल भाषणाला उभे राहिल्यानंतर घोषणा आणि टाळ्यांनी स्टेडियम दणाणून गेलं. सुरवातीपासूनच राहुल गांधी आक्रमक होते. त्याच्या भाषणात जोर होता, जरब होती आणि उत्स्फुर्तपणाही होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघावर त्यांनी जोरदार टीका केली. त्यांची बॉडीलँग्वेजही आश्वासक असल्याने राहुल बदल रहे है नाही तर राहुल बदल गये है अशी प्रतिक्रीया कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत होती.

स्टेजच्या खाली पहिल्या रांगेत सोनिया गांधी आणि पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते बसले होते. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाकडे सोनिया गांधींही कौतुकानं बघत होत्या. मध्येच त्यांची नजर शेजारी बसलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडेही जात होती. राहुल यांच्या भाषणांना टाळ्यांच्या वाढणाऱ्या प्रतिसादाने त्यांच्या चेहेऱ्यावरचे भावही बदलत होते. खाली आल्यानंतर सोनियांनी राहुल यांना जवळ घेत त्यांचं कौतुकही केलं तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर आपल्या मुलाचं कौतुक स्पष्ट दिसत होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2018 07:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close