...आणि, राहुल द्रविड पालकांप्रमाणे रांगेत उभा राहिला !

...आणि, राहुल द्रविड पालकांप्रमाणे रांगेत उभा राहिला !

साधेपणा म्हणजे नक्की काय याचा प्रत्यय हल्ली जरा कमीच येतो . त्यातून जर सेलिब्रेटी असतील तर बघायलाचं नको..पण या समजालाही कधीकधी छेद जातो . ट्विटरवर सध्या एक इमेज जोरदार वायरल होतेय. आणि ही इमेज आहे क्रिकेटपटू राहुल द्रविड याची.

  • Share this:

25 नोव्हेंबर, नवी दिल्ली : साधेपणा म्हणजे नक्की काय याचा प्रत्यय हल्ली जरा कमीच येतो . त्यातून जर सेलिब्रेटी असतील तर बघायलाचं नको..पण या समजालाही कधीकधी छेद जातो . ट्विटरवर सध्या एक इमेज जोरदार वायरल होतेय. आणि ही इमेज आहे क्रिकेटपटू राहुल द्रविड याची. आपल्या मुलांसोबत सायन एक्झिबिशनमध्ये शांतपणे उभा असल्याचा राहुलचा फोटो सोशल मीडियावर फारच लोकप्रिय झालाय.

आपण, सेलिब्रिटी असल्याचा कुठलाही अभिनिवेश नाही, सेलिब्रिटी असूनही राहुल द्रविड एकदम साधेपणाने रांगेत उभा आहे, चेहऱ्यावर सेलिब्रिटी असल्याचा कुठलाही अर्विभाव नाही, साध्या पालकाच्या भूमिकेत शांतपणे उभा असलेल्या या 'द वॉल' द्रविडच्या फोटोचं ट्विटरकरांनी खूपच कौतुक केलंय. द्रविड उत्तम क्रिकेटर आहे पण माणूस म्हणूनही तो खूप ग्रेट आहे, हेही आपण अनेकदा वाचलं आहे. पण त्याची प्रचिती आज नव्यानं आली आतापर्यंत 12 हजार लोकांनी या फोटोला लाईक केलय. राहुल द्रविडच्या चाहत्यांसाठी हा फोटो म्हणजे त्यांच्या लाडक्या क्रिकेटरविषयीच्या प्रेमात भरच घालणारा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 02:55 PM IST

ताज्या बातम्या