राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीत या गोष्टींवर झाला निर्णय

राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीत या गोष्टींवर झाला निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये, समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याची काँग्रेसची तयारी आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास

नवी दिल्ली, 29 जून : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये, समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.

राज्यात वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यापूर्वी राज्यातल्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करावी, असा आदेश राहुल गांधींनी दिला आहे,असं काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

'वंचित'शी युती करण्याची काँग्रेसची तयारी

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला विधानसभा निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचा विचार काँग्रेस नेते वारंवार बोलून दाखवत आहेत. आता वंचित बहुजन आघाडी याबदद्ल काय भूमिका घेते तेही पाहावं लागेल. काँग्रेस प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करायला तयार आहे, आता त्यांनीही प्रतिसाद द्यावा, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसच्या सतेज पाटलांचं पुन्हा 'ठरलंय', विधानसभेसाठी हालचाली

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, वर्षा गायकवाड, केसी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, सोनल पटेल, नाना पटोले, शरद रणपिसे, नसीम खान, हुसेन दलवाई हे सगळे नेते उपस्थित होते.

नाना पटोलेंचा राजीनामा

दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या किसान काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा देत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोलेंनी नागपूरमधून भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती.

======================================================================================================

VIDEO : काय म्हणाला 'तो' बिल्डर ज्याच्यामुळे पुण्यात गेले 15 जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading