हवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती

हवाईदलात 33 वर्षात एकही लढाऊ विमान नाही, अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती

हवाईदलात गेल्या 33 वर्षात एकही लढाऊ विमान दाखल झालं नाही अशी माहिती हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी आज सुप्रीम कोर्टात दिली.

  • Share this:

नोव्हेंबर, ता.14 नोव्हेंबर : हवाईदलात गेल्या 33 वर्षात एकही लढाऊ विमान दाखल झालं नाही अशी माहिती हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी आज सुप्रीम कोर्टात दिली. 1985 मध्ये सुखोई ही लढाऊ विमानं दाखल करण्यात आली होती. हे 3.5 व्या पीढीचं विमान आहे. चवथ्या आणि पाचव्या पीढीची विमानं हवाईदलाकडे सध्या नाहीत अशी माहितीही हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राफेलच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या खरेदीची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी यासाठी काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्या सर्वांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.

अधिक माहिती मिळवण्यासाठी कोर्टानं हवाई दलाच्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही कोर्टात पाचारण केलं होतं. त्यावरून एअर व्हाईस मार्शल जे चलापती आणि एअर मार्शल अनिल खोसला सुप्रीम कोर्टात उपस्थित होते. कोर्टानं त्यांच्याकडून थेट माहिती घेतली आणि हाईदलाच्या गरजा समजून घेतल्या.

दरम्यान, राफेल विमानांच्या खरेदीच्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टनं राखून ठेवलाय. त्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर सरन्यायाधीश त्यांना म्हणाले इथं कोर्टात वेगळीच लढाई असते. आता तुम्ही खऱ्या वॉर रूममध्ये जावू शकता.

बुधवारी झालेल्या सुनावणीत कोर्टानं राफेलच्या ऑफसेट करारात बदल करण्याची आवश्यकता होती का? अशी विचारणाही सरकारला केली. राफेलच्या किंमतीबाबत विस्तृत माहिती घेण्याची कोर्टाला सध्यातरी गरज वाटत नाही असंही सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान सांगितलं. त्याचबरोबर किंमतीची माहिती याचिकाकर्त्यांना देण्याची गरज नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.

याचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट

 

 

 

First published: November 14, 2018, 10:00 PM IST

ताज्या बातम्या