चौकीदार चोर है; राहुल गांधींचा माफी मागण्यास नकार

चौकीदार चोर है; राहुल गांधींचा माफी मागण्यास नकार

राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी अद्याप सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल : राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली. यावेळी कोर्टाचा हवाला दिल्यानं राहुल गांधींविरोधात भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी कोर्टात याचिका दाखल केली. याप्रकरणामध्ये राहुल गांधी माफी न मागता खेद व्यक्त केला आहे. प्रचारादरम्यान आपल्या तोंडून अनावधानानं कोर्टाचा हवाला देत घोषणा दिली गेली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यामध्ये ज्यावेळी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं राहुल गांधी यांना प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सुट दिली होती. पण, राहुल गांधी यांनी मात्र प्रतिज्ञापत्राद्वारे माफी मागण्यास नकार दिला आहे.

काय घडलं कोर्टात

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारात रान उठवलं होतं. त्यावरून त्यांनी दिलेली 'चौकीदार चोर है' ही घोषणाही चांगलीच गाजली. मात्र, सुप्रीम कोर्टाचं नाव घेत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून त्यांना माफी मागावी लागली. कोर्टाने 22 एप्रिलला जो निकाल दिलाय त्यात राजकीय फायद्यासाठी कोर्टाचा वापर करू नका अशी राहुल गांधी यांना तंबी दिली असा दावा भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी केला होता.

आपल्या जाहीर प्रचारसभांमध्ये देखील राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपनं 'मै भी चौकीदार' कॅम्पेन सुरू केल्यानंतर काँग्रेसनं देखील त्याला त्याच तोडीचं उत्तर दिलं आहे.

या साऱ्या प्रकरणानंतर आता भाजप काय करणार हे देखील पाहावं लागणार आहे. शिवाय, सारं प्रकरण न्यायप्रविष्ठ देखील आहे.

VIDEO: ...म्हणून आमच्यासाठी ही निवडणूक सोपी आहे- श्रीरंग बारणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading