स्वतःच्या कार्यक्षेत्रातही विखे पाटील बॅनरहून गायब!

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपुर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात आलं नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 07:56 AM IST

स्वतःच्या कार्यक्षेत्रातही विखे पाटील बॅनरहून गायब!

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 06 एप्रिल : राधाकृष्ण विखेपाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे नगर जिल्हयातील काँग्रेसमधे चाललं तरी काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपुर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात आलं नाही. सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांचा फोटोदेखील बोर्डवर छापण्यात आला आहे. मात्र विखे पाटलांचा फोटो का डावलला असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

महत्वाची बाब म्हणजे श्रीरामपुर इथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरांत यांच्या हस्ते करण्यात आलं. काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक मानले जातात. मात्र कांबळेंनी बाळासाहेब थोरातांची मदत घेतल्याने विखे पाटील हे कांबळेपासून दुर आहेत. विखेंनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे विखे पुत्र सुजय विखे भाजपात गेल्यानंतर विखे पाटलांच्या काँग्रेस निष्ठेवर थोरातांनी हल्लाबोल केला.

हेही पाहा: VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा 'गलती से मिस्टेक'; पाहा काय म्हणाले..

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे अडचणीत आले आहेत. विखेंपेक्षा मोठे होण्याची संधी यामुळे थोरातांकडे आली आहे. थोरातांनी संपूर्ण  प्रचार यंत्रणा कांबळे यांच्या पाठीशी उभी केली आहे. सर्व सुत्रे थोरात यांच्या यंत्रणेने हातात घेतली आहे. थोरात यांनी फायदा उचलत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना एकत्र करत थोरातांनी विखेंच्या विरोधकांची मोट बांधली आहे.

Loading...

विखे पाटील राज्याचे नेते आहेत म्हणून त्यांचा फोटो तालूक्यात नाही असे खोचक उत्तर थोरातांनी दिले आहे. खरंतर विखे आणी थोरात यांच्यातील या राजकीय संघर्षामुळे शिर्डीची काँग्रेसची जागा अडचणीत आली आहे. विखे समर्थक असलेल्या कांबळेंना थोरातांनी जवळ करताच विखेंच्या कार्यकर्त्यांनी कांबळेंची साथ सोडत विखे पाटलांचा कोणताही आदेश नसल्याचं सांगत कांबळेच्या प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे.

पण सगळ्यावर आता विखे पाटील काय निर्णय घेणार आणी नगर बरोबरच शिर्डी लोकसभेचा खासदार कोण होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे.


सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 07:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...