क्रिकेट इतिहासातला अजब प्रकार, एका मांजरीनं कर्णधाराला केलं संघाबाहेर

क्रिकेट इतिहासातला अजब प्रकार, एका मांजरीनं कर्णधाराला केलं संघाबाहेर

अरे देवा. एका मांजरीनं केले कर्णधाराला संघाबाहेर.

  • Share this:

सिडनी, 13 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानात नेहमीच काहीतरी अजब प्रकार घडत असतात. मात्र एक प्राण्यामुळं संघातील खेळाडू संघाबाहेर गेला असेल, असा प्रकार कधीच घडला नसेल. मात्र क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला की एक मांजरीमुळे कर्णधाराला मैदानात सोडावे लागले.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये हा प्रकार घडला आहे. या लीगमध्ये सिडनी थंडर संघाची कर्णधार रेचेल हेंससोबत असा प्रकार घडला आहे. यामुळं रेचेलच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सगळ्याचे कारण होती, एक मांजर.

रेचेल हेंसजवळ असलेली एका पाळीव मांजरीमुळे तिला संघाबाहेर जावे लागले. रेचेलची मांजर तिलाच चावली, त्यामुळं तिच्या पायाला इनफेक्शन झाले. ज्यामुळं रेचेलला संघातून माघारी घ्यावी लागली. या सगळ्याचा फटका सिडनी थंडर या संघाला बसला. रेचेल खेळू न शकल्यामुळे संघाला पराभव सहन करावा लागला.

वाचा-स्मार्ट गोलंदाजानं अम्पायरला दिला चकवा! हा VIDEO एकदा पाहाच

सिडनी थंडरची गोलंदाज हना हार्लिंगटननं, “रेचेल आपली पाळीव मांजर आणि एका जंगली प्राण्यामध्ये झालेले भांडण सोडवत होती. तेव्हा रेचेलच्या मांजरीनं तिच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळं तिला इनफेक्शन झाले आहे”, असे सांगितले. बीग बॅश लीगमधला हा पहिला प्रकार आहे. 2018मध्ये ऑस्ट्रेलियाचा डीआर्सी शॉर्टसोबतही असाच प्रकार घडला होता. शॉर्टवर त्याच्या पाळीव कुत्र्यांनं हल्ला केला होता. त्यानंतर त्यालाही एका सामन्यातून माघार घेतली होती.

Loading...

वाचा-शतकी खेळीनंतर ‘परफेक्ट’ फलंदाजाला पंचांनी दिला धोका, VIDEO पाहून व्हाल थक्क

रेचेल खेळणार पुढचा सामना

सध्या जखमी असलेली रेचेल (Rachael Haynes) पर्थ स्कोर्चर्स विरोधात होणारा सामना खेळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात सिडनी थंडरला 152 धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र 20 ओव्हरमध्ये त्यांना या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. त्यामुळं संघाला विजय मिळवण्यासाठी पुढच्या सामन्यात रेचेल पुनरागमन करू शकते. संघाच्या डॉक्टरांनी रेचेलची जखम गंभीर नसल्याचे सांगितले आहेत.

वाचा-असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2019 08:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...