आर. आर. आबांच्या मुलीचा येत्या शनिवारी अंजनीत साखरपूडा

आर. आर. आबांच्या मुलीचा येत्या शनिवारी अंजनीत साखरपूडा

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील दौंड तालुक्याची सून होणार आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात याच्याची स्मिताचा येत्या शनिवारी साखरपूडा होणार आहे. आर. आर. आबांच्या अंजनी गावातच साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे

  • Share this:

04 डिसेंबर, मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील दौंड तालुक्याची सून होणार आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात याच्याची स्मिताचा येत्या शनिवारी साखरपूडा होणार आहे. आर. आर. आबांच्या अंजनी गावातच साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे तर शुभविवाह येत्या महाराष्‍ट्रदिनी म्हणजेच १ मेला २०१८ रोजी पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे हा विवाह सोहळा संपन्‍न होणार आहे. या नव्या नात्यामुळे राज्यातील पाटील व थोरात ही दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत. हे लग्न जुळवण्यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे.

आर. आर. आबांच्या निधनानंतर पाटील त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी स्वतः शरद पवारांनी घेतलीय. म्हणूनच हे लग्न जुळवून आणण्यासाठी स्वतः पवारसाहेबांनीच पुढाकार घेतलाय. आर. आर. पाटील आणि रमेश थोरात हे दोघेही शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. ही दोन कुटुंबे एकत्र यावेत अशी पवार यांचीही इच्‍छा असल्याने त्यांनीच या विवाहाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे, असे रमेश थोरात यांनी सांगितले. तसेच शरद पवार हे लग्‍न समारंभासाठी दिवसभर स्‍वत: थांबणार आहेत, असंही त्यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या निधनानंतर त्यांच्या तासगाव मतदार संघाचे नेतृत्‍व पत्‍नी सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. त्यात तिथल्या आमदारही आहेत. तर आबांची मुलगी स्मिता हिच्या खांद्यावर राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आलीय. सुप्रिया सुळे यांचंही आर. आर. पाटलांच्या कुटुंबियांकडे विशेष लक्ष असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 10:16 PM IST

ताज्या बातम्या