जेवणासाठी आणलेल्या शिमला मिर्चीत सापडला जिवंत बेडूक

जेवणासाठी आणलेल्या शिमला मिर्चीत सापडला जिवंत बेडूक

जेवणासाठी आणलेल्या शिमला मिर्चीमध्ये बेडुक सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

ओटावा, 20 फेब्रुवारी : बाजारातून आणलेला भाजीपाला काळजीपूर्वक निवडला केला जातो. एखाद्यावेळी भाजीपाला खराब झालेला असू शकतो. तसंच फ्रीजमध्ये किंवा घरी ठेवल्यानंतर त्यात अळ्या वगैरे होण्याचीही शक्यता असते. भाजीपाला बाहेरून दिसायला चांगला असला तरी तो कापल्यानंतर कसा निघेल सांगता येत नाही. कॅनडातील एका दाम्पत्याला जेवण तयार करताना धक्का बसला आहे. शिमला मिर्ची चिरताच त्यातून जिवंत बेडूक सापडल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.

क्यूबेकमधील निकोल गागन आणि गेरार्ड ब्लॅक हे जेवण बनवत होते. त्यावेळी शिमला मिर्चीमध्ये त्यांना जिवंत बेडूक आढळला. दाम्पत्याने सांगितलं की, ज्या शिमला मिर्चीमध्ये बेडूक सापडला ती मिर्छी क्यूबेक इथल्या कृषी, मत्स्य आणि अन्न मंत्रालयाकडे पाठवला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत.

एका युजरने म्हटलं की, मलासुद्धा शिमला मिर्चीमध्ये असं काहीसं सापडलं होतं. त्यानंतर जेव्हापण मी मिर्ची कापतो तेव्हा भीती वाटते. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, मला केळामध्ये एक किडा सापडला होता. त्यानंतर दोन वर्ष मी केळं खाल्ली नव्हती. खरंतर शिमला मिर्चीत बेडुक गेलाच कसा असा प्रश्न सर्वांनाच हैराण करून टाकणारा आहे. आता अधिक तपास केल्यानंतरच याची माहिती समोर येईल. भाजीपाल्यात असे किडे सापडण्याची घटना नवी नाही.

गाईने लहान मुलाला तुडवलं, पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं धाडसं होणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: frog
First Published: Feb 20, 2020 10:46 AM IST

ताज्या बातम्या