डॉक्टरांनी घरी पाठवलं म्हणून मस्त क्रिकेट खेळला, नातेवाईकांनाही भेटला आणि आता...

डॉक्टरांनी घरी पाठवलं म्हणून मस्त क्रिकेट खेळला, नातेवाईकांनाही भेटला आणि आता...

शिरदे गावातील हा 19 वर्षीय तरुण मुंबईतील चेंबूर परिसरातून चालत दापोलीमध्ये आला होता.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 06 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांची योग्य ती खबरदारी घेण्याची मोठी जबाबदारी डॉक्टर आणि रुग्णालयावर आली आहे. परंतु, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दापोलीत क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तीचा  व्यक्तीचा स्वबचा अहवाल येण्यापूर्वी डिस्चार्ज देण्यात देण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीच दिवशी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे. अहवाल येण्यापूर्वी त्याला डिस्चार्ज दिला होता का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा- योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले, शिवसेनेचं टीकास्त्र

डिस्चार्ज देण्यात आल्याने आपण सुटलो म्हणून या तरुणाने  दापोली शहरातील कालकाई कौंड परिसरात मित्रासोबत क्रिकेटही  खेळला. एवढंच नाहीतर आपल्या शिरदे गावी जाऊन सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. हा तरुण आपल्याला कोरोना झाला नाही याच्या आनंदात असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या तरुणाला रात्रीतूनच घरातून उचलण्यात आलं आहे.

त्याच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दापोली शहरातील भारत नगर, नशीमन कॉलनी, कालकाई कौंड, मोहला, चोरगेवाडी, बौद्धवाडी, आमराई, नागरबुडी, बुरुड आली आझाद नगर, एन के वराडकर कॉलेज परिसर, काणे गल्ली, मटण मार्केट, एस टी स्टँड परिसर, पंगारवाडी हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे.

हेही वाचा-LIVE SEX पाहणं महागात पडलं, हॅकर्सनं जाळ्यात अडकवून असा घातला गंडा!

शिरदे गावातील हा 19 वर्षीय तरुण मुंबई चेंबूर येथून  28 एप्रिल रोजी  चालत दापोलीत आला होता. नाकाबंदीवर त्याला पोलिसांनी अडवून उप जिल्हा रुग्णालयात तपासणी करिता पाठवले होते.  2 मे रोजी स्वब घेण्यात आला आणि 5 रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, 4 मे रोजी त्याला घरी सोडण्यात आल्याने दापोली शहरात तो अनेकांच्या संपर्कात आला असल्याने खळबळ उडाली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 6, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या