ना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण दिलं 5 वाजता; मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार

ना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण दिलं 5 वाजता; मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार

मुंबईच्या पवई परिसरातील क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीमध्ये आज विलग करून ठेवण्यात आलेल्या रुग्णांनी मोठा गोंधळ घातला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अशात मुंबईतील कोरोना रुग्णांच्या अवस्थेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या पवई परिसरातील क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीमध्ये आज विलग करून ठेवण्यात आलेल्या रुग्णांनी मोठा गोंधळ घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णांना सकाळचा नाष्टा मिळाला नाही. दुपारचं जेवण मिळालं ते थेट 5 वाजता. त्यामुळे इथे ठेवण्यात आलेल्या 1650 नगरीकांपैकी काहींनी आज इमारतीच्या खाली उतरून गोंधळ घातला. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. या इमारतीमध्ये जेवणाचा कंत्राट नव्या संस्थेला देण्यात आलं होतं. त्या संस्थेनं आयत्या वेळी हात वर केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं या विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांनी सांगितलं आहे.

लॉकडाउन 4.0मध्ये देशात 12 तास असणार कर्फ्यू, अशा आहेत नव्या अटी

आपण जुन्याच संस्थेला काम दिला असून असा प्रकार पुन्हा होणार नाही याची खात्री त्यांनी दिली आहे. पण दरम्यान, नागरिकांनी मात्र मोठा गोंधळ घातला आहे. एककीडे असं असताना दुसरीकडे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय इथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजिकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत इथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील.

कोरोनाचं थैमान! राज्यात एका दिवसात आढळले 2347 रुग्ण, ही आहे लेटेस्ट आकडेवारी

सोमवारपासून बीकेसी इथल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचं काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांचं अतिदक्षता विभागदेखील सुरू केला जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं. दरम्यान, मुंबीतील खासगी रुग्णालयातील 60 टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Cyclone Amphan : अम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला, या राज्यांत NDRFच्या 17 तैनात

संपादन - रेणुका धायबर

First published: May 17, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या