टीव्ही अँटेनाला लटकून सापाने केली पक्ष्याची शिकार, VIDEO व्हायरल

टीव्ही अँटेनाला लटकून सापाने केली पक्ष्याची शिकार, VIDEO व्हायरल

शिकार ठरलीच तर कशी केली जाऊ शकते, याचे थरकाप उडवणारे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक महिलेनं आपल्या घरावर जे काही घडले ते पाहून पुरती हैराण झाली.

  • Share this:

24 फेब्रुवारी : शिकार ठरलीच तर कशी केली जाऊ शकते, याचे थरकाप उडवणारे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक महिलेनं आपल्या घरावर जे काही घडले ते पाहून पुरती हैराण झाली. कैथी गल नावाच्या या महिलेनं आपल्या फेसबुक अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक मोठा अजगर टीव्ही अँटेनाला वेढा घालून एका पक्षाची शिकार केली. कैथी गलने बुधवारी सकाळी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यानंतर हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आणि लगेच हा व्हिडिओ व्हायरल झाला.

या घटनेनंतर या महिलेनं सांगितलं की, 'पक्ष्याला फस्त करायला अजगराला दीड तास लागला होता. कैथीने व्हिडिओ शेअर करताना फेसबुक कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, या अगोदर मी असा प्रसंग कधीच पाहिला नव्हता. आमच्या घराच्या छतावरील अँटेनावर हा अजगर लटकत होता आणि त्या पक्षाला खाण्यासाठी प्रयत्न करत होता आणि थोड्य़ाच वेळात अजगराचे हे प्रयत्न फळाला आले."

इंटरनेटवर आल्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अशाच पद्धतीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एका अजगराने आपल्य़ाहुन मोठ्या हरणाला आपलं भक्ष्य केलं होतं.

==================

First published: February 24, 2019, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading