मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /पुण्यात मास्क घोटाळा; मास्क लावून पत्नीच्या जागी दुसऱ्याच महिलेला केलं उभं, पतीने केला लाखोंचा फ्रॉड

पुण्यात मास्क घोटाळा; मास्क लावून पत्नीच्या जागी दुसऱ्याच महिलेला केलं उभं, पतीने केला लाखोंचा फ्रॉड

कोरोना काळात पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे गुन्हेगारीत होणारे बदल अधिक लक्ष देऊन तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

कोरोना काळात पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे गुन्हेगारीत होणारे बदल अधिक लक्ष देऊन तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

कोरोना काळात पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे गुन्हेगारीत होणारे बदल अधिक लक्ष देऊन तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

पुणे, 24 जून : कोरोनामुळे मास्क घालणं सगळ्यांना बंधनकारक आहे. परंतू याचा गैरफायदा उठवत पुण्यातील एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत:च्या पत्नीऐवजी दुसऱ्या महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेला आणि तिच्यामार्फत सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंद करुन तपास सुरू केला आहे.

कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करणारा मास्क हा जणू आपल्या चेहऱ्याचा एक भाग बनला आहे. पण याच मास्कचा उपयोग फसवणुकीसाठी केला जाईल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु पुण्यातील कविता जाधव यांच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता मास्कचा गैरवापर करुन हडपण्याचा प्रयत्न झाला आहे, तो देखील त्यांच्या पतीकडून. कविता जाधव आणि त्यांचे पती राहुल जाधव हे दोघे पुण्यातील कात्रज भागात राहतात.

कविता यांच्या नावावर एक फ्लॅट आणि एक दुकान आहे. तर दोन फ्लॅट हे कविता आणि त्यांचे पती राहुल यांच्या सामायिक मालकीचे आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात कडक लॉकडाऊन असताना राहुल जाधव यांनी पत्नीच्या नावावर असलेली ही सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखला. त्यासाठी एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून ते नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेले आणि बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यासाठी बायकोची खरी कागदपत्र त्यांनी वापरली. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर असलेल्या फोटोमधील व्यक्तीच आपल्याकडे नोंद करण्यासाठी आली आहे का हे पाहिलंच गेलं नाही.

याच पॉवर ऑफ अॅटर्नीचा उपयोग करुन राहुल जाधव यांनी 14 जून रोजी पत्नीच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयातून कविता जाधव यांना पती फोन वर संभाषण करत असताना कविता यांच्या ध्यानात हा प्रकार आला.

हे ही वाचा-Pune Ambil Odha: आमच्या घरच्यांना मारलं, आम्ही कुठं जायचं? चिमुरडा ढसाढसा रडला

संसारात काहीच मदत न करणारा आणि पत्नीची मालमत्ता हडप करून ऐश आराम मनसुबे आखणारा पती राहुल हा कवितांना मारहाण करत असे. याशिवाय धमक्याही देत असे. या आधी पोलिसांचा  अनुभव वाईट असल्यानं कविता यांनी व्यवसायाने वकील असलेल्या मनसेच्या रुपाली पाटील यांना गाठलं. आणि मदत मागितली. रुपाली यांनी त्यांना धीर देत पोलिसांत तक्रारही करायला लावली. सहायक पोलिस आयुक्त सुषमा पाटील यांना या प्रकरणात तक्रार मिळाली असून प्रकरणाची शहानिशा करून कारवाई करू असं म्हटलं आहे.

मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार होताना नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात दोघांचेही फोटो घेतले जातात. कागदपत्रे पहिली असता कविता जाधव यांच्या नावाने व्यवहार करणारी महिला वेगळीच असल्याच फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मास्क घातल्याने महिला ओळखू आली नाही ही सबब किंवा पळवाट तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयातील कोणी कर्मचारी सहभागी आहेत का याचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे, असं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Crime, Mask, Money fraud, Pune