• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कानात डिव्हाइस घालून परीक्षा देताना रंगेहात पकडलं; मोठ्या रॅकेटशी संबंध असल्याच्या संशयाने चौकशी सुरू

कानात डिव्हाइस घालून परीक्षा देताना रंगेहात पकडलं; मोठ्या रॅकेटशी संबंध असल्याच्या संशयाने चौकशी सुरू

परीक्षेत कॉपी करीत असताना पर्यवेक्षकांनी तिला रंगेहात पकडलं.

 • Share this:
  जौनपुर, 7 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील जौनपुरमध्ये (Jaunpur) शनिवारी टीजीटी (TGT) परीक्षामध्ये एका महिला परीक्षार्थी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करीत असताना पकडली गेली. कॉलेज प्रशासनाने महिलेला परीक्षेदरम्यान कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावला असताना पकडलं. सांगितलं जात आहे की, महिला यापूर्वीही पाली येथील परीक्षेत पकडली गेली होती. तिचे नाव सुनीता मोर्या असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. सांगितलं जात आहे की, महिलेचे मोठ्या रॅकेटशी संबंध असल्याची शक्यता आहे. यासाठी पोलीस आणि परीक्षेशी संबंधित अधिकारी सातत्याने महिलेची चौकशी करीत आहे. या प्रकरणात मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र महिला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नसल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी पाली येथे परीक्षा संपल्यानंतर टीडी कॉलेज प्रशासनाने महिलेला डिव्हाइससह पोलिसांच्या हवाले केलं होतं. पोलीस आपल्या तज्ज्ञांच्या टीमसह डिव्हाइस आणि महिलेसोबत बराच वेळ चौकशी करीत होते. हे ही वाचा-Shocking! पोलीस चीफ केस कापण्यासाठी लागले मागे; जवानाने बंदुक काढली आणि... पोलिसांच्या चौकशीत अद्याप कोणतीही मोठी माहिती समोर आलेली नाही. सांगितलं जात आहे की, वर्षभरापासून महिलेचे कनेक्शन मोठ्या पेपर रॅकेटशी असल्याची शक्यता आहे. यासाठी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माध्यमिक शिक्षण निवड मंडळ प्रयागराज, उत्तर प्रदेश आयोजित 2021 चे प्रशिक्षित पदवीधर निवड मंडळाची परीक्षा 07 आणि 08 ऑगस्ट 2021 रोजी आहे. यासाठी जोनपूर जिल्ह्यात 21 परीक्षा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

  Published by:Meenal Gangurde
  First published: