या ठिकाणी फिरायला गेलात तर आवर्जून घ्यायला हव्यात काही वस्तू

प्रवास स्मरणात ठेवण्यासाठी खरेदी करता येतील तुम्हाला या वस्तू

  • Share this:

एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तुम्ही तिथली आठवण म्हणून एखादी वस्तू घरी आणता. मात्र, कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू प्रसिद्ध आहे हे अनेकांना महित नसतं. त्यामुळे प्रवास स्मरणात ठेवण्यासाठी कोणत्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी करता येतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

भरताचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या जम्मी काश्मीरमध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर तिथल्या काश्मिरी शॉल आणि काश्मिरी गालीचे नक्की खरेदी करा. जम्मी काश्मीरमध्ये या वस्तू खरेदी केल्यास तिथल्या आठवणी तुमच्या कायम स्मरणात राहतील.

कलाकुसरीच्या आणि पितळ धातु पासून तयार केलेल्या अनेक वस्तू हरियाणात मिळतील. देवी देवतांच्या मूर्ती तसंच दागिने ठेवण्यसाठी तयार केलेले बॉक्स अशा कही वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर हरियाणातला प्रवास तुमच्या कायम स्मरणात राहील. हरियाणात लाकडापासून तयार केलेल्या वस्तूसुद्धा प्रसिद्ध आहेत.

कर्नाटकमध्ये उत्तम प्रकारचं रेशीम मिळतं. तुम्हाला मैसूर ते खरेदी करता येईल. भारतात रेशमाचं सर्वात जास्त उत्पादन कर्नाटकमध्येच घेतलं जातं. त्यामुळे इथल्या रेशमापासून विणलेल्या मुलायम वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर कर्नाटकमधली ट्रिप कायम तुमच्या स्मरणात राहील.

काचेच्या लहान-मोठ्या तुकड्यांपासून सजविलेल्या अनेक वस्तू तुम्हाला गुजरातमध्ये मिळतील. स्वतःसाठी किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. अशा अनेक वस्तू तुम्हाला अहमदाबादध्ये खरेदी करता येतील.

झारखंडमध्येसुद्धा पितळी धातुपासून तयार केलेल्या वस्तू प्रसिध्द आहेत. पितळ वितळवून त्यापासून देवी देवातांच्या सुबक आणि सुंदर मूर्ती या राज्यात घडविल्या जातात. त्या जर तुम्ही खरेदी केल्या आणि तुमच्या घरात ठेवल्या तर नक्कीच या झारखंडमधल्या तुमच्या आठवणी कायम ताज्या राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 09:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading