News18 Lokmat

पंतप्रधानांकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत पुरंदरेंनी केलेल्या कार्याची आवर्जून प्रशंसा केली.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2017 09:12 PM IST

पंतप्रधानांकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा 

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत पुरंदरेंनी केलेल्या कार्याची आवर्जून प्रशंसा केली. एवढंच नाहीतर नरेंद्र मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीचे फोटोही ट्विट केले.

शिवसृष्टी कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी बाबासाहेबांनी मोदींची ही भेट घेतली. यावेळी बाबासाहेब पुरंदरेंनी मोदींना शिवरायांची पगडीही भेट दिली. मोदींनी पगडी घातलेला फोटो आवर्जून ट्विट केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं मोठं योगदान आहे. याबद्दलच राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...