मिग-21 विमानाचा हवेत स्फोट, तुकडे-तुकडे होऊन कोसळले

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मिग-21 विमानाचा हवेत स्फोट झाला होता त्यानंतर ते एका झाडावर आदळले आणि आग लागली.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 04:54 PM IST

मिग-21 विमानाचा हवेत स्फोट, तुकडे-तुकडे होऊन कोसळले

हिमाचल,18 जुलै : भारतीय वायू सेनेचं लढाऊ विमान मिग-21 हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील जवाली गावात कोसळले. या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मिग-21 विमानाचा हवेत स्फोट झाला होता त्यानंतर ते एका झाडावर आदळले आणि आग लागली.

या विमानाने पंजाब येथील पठाणकोट हवाईतळावरून उड्डाण घेतली होती आणि थोड्यात वेळात या विमानाला अपघात झाला. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली आहे. पठाणकोट हवाईतळावरुनही एक टीम घटनास्थळी रवाना झालीये.

बुधवारी दुपारी1.21 मिनिटाने पठाणकोट हवाईतळावरून हिमाचलसाठी या विमानाने उड्डाण भरले होते. फतेहपूर येथील जाट्टीया जवळील एका गावाजवळ या विमानाला अपघात झाला. ज्या ठिकाणी विमानाचा अपघात झाला तिथे विमानाचे अवशेष विखरूलेले आहे.

एसपी संतोष पटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात पायलट शिवाय कुणीच नव्हते. सध्या या पायलटाचा मृतदेह बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

याआधीही याच वर्षी जानेवारी महिन्यात मिग-21K विमान गोवा विमानतळावर धावपट्टीवर क्रॅश झाले होते. त्यावेळी पायलटला वेळीच बाहेर काढण्यात आले होते.

मिग-21 हे सुपरसाॅनिक लढाऊ जेट विमान आहे. मागील वर्षी 29 डिसेंबर 2017 मध्ये मिग-21 विमानाला भारतीय वायुसेनेनं निरोप दिला होता. राजस्थानच्या नाल येथील वायुसेना स्टेशनवरुन मिग-21 विमानाने शेवटचे उड्डाण भरले होते आणि वायुसेनेनं या विमानाला अलविदा केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...