#AmritsarTrainAccident : कार्यक्रमाची कोणतीच कल्पना नव्हती, रेल्वेचा दावा

#AmritsarTrainAccident : कार्यक्रमाची कोणतीच कल्पना नव्हती, रेल्वेचा दावा

अमृतसरमध्ये विजयादशमीला रक्ताचे सडे पडले. पंजाब राज्यातल्या अमृतसरमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमात 60 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

पंजाब, 20 ऑक्टोबर : अमृतसरमध्ये विजयादशमीला रक्ताचे सडे पडले. पंजाब राज्यातल्या अमृतसरमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमात 60 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले आहेत. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकांना भरधाव रेल्वेनं चिरडलं. यामध्ये अनेकांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

पठाणकोटहून अमृतसरकडे येणाऱ्या भरधाव एक्स्प्रेसच्याखाली रक्ताचा सडा पसरला. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. अमृतसरच्या जौडा बाजार रेल्वे फाटकाजवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे.

धक्कादायक म्हणजे काँग्रसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र मृत्यूचं तांडव सुरू असताना दोघांनीही गाडीतून पळ काढल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पण या कार्यक्रमाची आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती किंवा या कार्यक्रमासाठी आम्ही कोणालाही परवाणगी दिली नाही त्यामुळे यात रेल्वे प्रशासनाची नाही तर स्थानिक प्रशासनाची चूक असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

तर हा सगळा कार्यक्रम पंजाब राज्य सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे या भीषण अपघाताला दबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.

अमृतसर रेल्वे दुर्घटनेचा घटनाक्रम

- अमृतसर - मानावाला स्टेशनदरम्यान गेट नंबर 27

- गेट नंबर 27 च्या परिसरात रावणदहन सुरु होते

- कार्यक्रम स्थळ आणि  रुळ यामध्ये 70 ते 80 मीटर अंतर

-  रेल्वे रुळालगत मोठ्या संख्येनं लोक उभे होते

- रावण दहनानंतर फटाके फुटू लागले

- फटाक्यांपासून बचावासाठी लोक रेल्वे ट्रॅककडे सरकले

- सायं. 6:30 ते 6:40च्या दरम्यान अमृतसर - जालंधर ट्रेन आली

- रुळाच्या परिसरातील लोक गाफील होते

- भरधाव ट्रेनने रुळावरच्या लोकांना चिरडले

दुर्घटनेनंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच

स्थानिकांकडून आक्रोश सुरू आहे. अमृतसरच्या रहिवाशांसाठी विजयादशमीची रात्र काळरात्र ठरली. दुर्घटनेनंतर संतप्त स्थानिक रस्त्यावर उतरले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या राजकारण्यांनी पळ का काढला असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय.

न्यूज18 लोकमतचे सवाल

1. लोकांना पाहून मोटरमननं रेल्वेचा वेग कमी केला नाही का?

2. ट्रेन येतात हे माहीत असूनही लोक ट्रॅकवर उभे कसे राहिले?

3. फाटकाच्या इतक्या जवळ रावनदहनाची परवानगी कुणी दिली?

4. कार्यक्रमाला गर्दी होणार हे ओळखून आयोजकांनी खबरदारी घेतली नव्हती का?

5. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लोकांना रुळावर कसं जाऊ दिलं?

Amritsar Train Accident : आणखी एक धक्कादायक VIDEO व्हायरल

First published: October 20, 2018, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading