Home /News /news /

पुण्याला आणखी मोकळा श्वास घेता येणार; या वारांनुसार सर्व दुकानं राहणार खुली

पुण्याला आणखी मोकळा श्वास घेता येणार; या वारांनुसार सर्व दुकानं राहणार खुली

नव्या सूचनेनुसार पुण्यातील आणखी काही दुकाने खुली करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही वार ठरवून दिले आहेत

    पुणे, 12 मे : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोना सर्वाधित धोका आहे. दीड महिन्यांहून जास्त कालावधीपासून राज्यातील अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. पुण्यातही प्रतिबंधित क्षेत्र वगळता लॉकडाऊन बऱ्याच अंशी शिथिल करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि कंटेन्मेंट झोन्स बाहेर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळात वारानुसार जी दुकाने सुरू करायला परवानगी दिली होती त्यात आता आणखी दुकानांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये इस्त्री, लॉन्ड्री, स्टेशनरी, वाहन दुरुस्ती विक्री, बांधकाम साहित्य विक्री, गृहोपयोगी साहित्य, तयार फर्निचर, वैद्यकीय साहित्य तयार करायला लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारे व्यवसाय, फूट वेयर दुकानांना आता वारानुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना काही वार ठरवून देण्यात आले आहेत. त्या वारांनुसारचं दुकाने खुली ठेवण्याची परवानही आहे. खाली दिलेल्या वारांनुसार पुण्यात दुकाने खुली राहणार पुणे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची नावे :  मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर १, २, पर्वती चाळ क्र. ५२ झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज १, २, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती १, २, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन १, २, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी, साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. ६५०, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर २, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. ६, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर १, २, ३, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर. (10 मे नुसार ही यादी तयार करण्यात आली आहे) संबंधित-पंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच गडकरींची 'आत्मनिर्भरता', नागपुरात आधीच करून दाखवलं!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या