शेलारमामा सुवर्णपदकाच्या 'शाकाहारी' वादावर पुणे विद्यापीठाचा खुलासा

शेलारमामा सुवर्णपदकाच्या 'शाकाहारी' वादावर पुणे विद्यापीठाचा खुलासा

'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' असं बिरूद मिरवणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या शेलारमामा सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीवरून चौफेर टीका होताच पुणे विद्यापीठाने देणगीदारावरचं नाव पुढे करून हात झटकलेत. या सुवर्णपदकासाठी शिष्यवृत्ती देणाऱ्या देणगीदारानेच ही अट ठेवल्याचा खुलासा पुणे विद्यापीठाने दिलाय. तसंच हे परिपत्रक 2006 सालापासूनच लागू असल्याचं पुणे विद्यापीठाने म्हटलंय.

  • Share this:

पुणे, 10 नोव्हेंबर : 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' असं बिरूद मिरवणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या शेलारमामा सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीवरून चौफेर टीका होताच पुणे विद्यापीठाने देणगीदारावरचं नाव पुढे करून हात झटकलेत. या सुवर्णपदकासाठी शिष्यवृत्ती देणाऱ्या देणगीदारानेच ही अट ठेवल्याचा खुलासा पुणे विद्यापीठाने दिलाय. तसंच हे परिपत्रक 2006 सालापासूनच लागू असल्याचं पुणे विद्यापीठाने म्हटलंय. विद्यापीठाची कुणाच्याही आहाराबात कुठलीही भूमिका नाही, असंही पुणे विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलंय. या परिपत्रकाबाबत सुवर्णपदकाचे देणगीदाराशी पुन्हा चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असंही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आलंय.

नेमकं काय म्हटलंय प्रसिद्धी पत्रकात ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे'शेलारमामा सुवर्णपदक' हे २००६ सालापासून देण्यात येते. त्याच्यासाठीचे निकषही तेव्हापासूनच अस्तित्वात आहेत. त्या निकषांनुसार शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या तसेच, खेळाडू, निर्व्यसनी आणि शाकाहारी विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. मात्र,कोणी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणताही भेद करत नाही आणि मानतही नाही. त्यामुळे या सुवर्णपदकाचे देणगीदार किंवा त्यांचे वारसदार यांच्याशी चर्चा करून आहाराच्या निकषाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी अधिकृत भूमिका विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात यणाऱ्या 'शेलारमामा सुवर्णपदका'साठी पात्र होण्यासाठी विविध अटींमध्ये शाकाहाराची अट असल्याबाबत बातम्या काही प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. त्याबाबत विद्यापीठाची भूमिका पुढीलप्रमाणे-

१. ही शिष्यवृत्ती विज्ञान आणि इतर विद्याशाखांसाठी आलटून पालटून दिली जाते. ती २००६ सालापासून सुरू आहे. त्याबाबतचे निकषही तेव्हापासूनच अस्तित्वात आहेत.

२. या निकषांनुसार विद्यार्थ्याची अभ्यासक्रमातील विशेष गुणवत्ता, दहावी-बारावी-पदवी परीक्षेतील गुण, त्याचा दैनंदिन जीवनातील आचार, विविध खेळांमधील प्राविण्य, प्राणायाम-योगासन-ध्यानधारण यातील गती, गायन-नृत्य-वक्तृत्व-नाट्य-इतर कला यांच्यातील नैपुण्य, रक्तदान-श्रमदान-पर्यावरणरक्षण-साक्षरता-स्वच्छता याबाबत जागरूकता तसेच, शाकाहारी आणि निर्व्यसनी असणे यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हे सर्व निकष २००६ सालापासून अस्तित्वात आहेत. त्यात नव्याने कोणतीही भर टाकण्यात आलेली नाही.

३. विद्यार्थ्यांनी कोणता आहार घ्यावा याबाबत विद्यापीठ कोणताही भेद करत नाही आणि तसा भेद मानतही नाही.

४. याबाबत 'शेलारमामा सुवर्णपदका'च्या देणगीदरांशी चर्चा करून योग् तो निर्णय घेतला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 10:24 PM IST

ताज्या बातम्या